दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, २१ नोव्हेंबर २०२०:कॉमेडियन भारती सिंहला अटक ते तृणमूलचे ५ खासदार भाजपच्या वाटेवर?

Headlines of the 21 November 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 21 November 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष यांच्या घरी एनसीबीने छापेमारी केली असून भारती सिंहला एनसीबीने अटक केली आहे. दुसरी बातमी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आहे. या गोळीबारात महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण आले आहे. तिसरी बातमी आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये तापमानात घसरण झाली असून कडाक्याची थंडी पडली आहे. एरवी डिसेंबर महिन्यात पारा घसरतो पण यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी जाणवत आहे. चौथी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा विकास योजनांच्या शुभारंभापेक्षा राजकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचा समजला जात आहे. पाचवी आणि शेवटची बातमी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे पाच खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. 

  1. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह, हर्षच्या घरात मिळाला गांजा, भारतीला NCBने केली अटक : ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील एकामागोमाग एक कलाकार हे एनसीबीच्या रडारवर येत आहेत. आता एनसीबी अर्थात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रसिद्द कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष यांच्या मुंबईतील घरी छापा टाकला. कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला आणि त्यांच्या घरातून ८६.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. पाकिस्तानचा पुन्हा भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने भारतीय गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील एका जवानाला वीरमरण आले आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. दिल्लीत कडाक्याची थंडी : दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. एरवी डिसेंबर महिन्यात पारा घसरतो पण यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी जाणवत आहे. संध्याकाळपासून ते सकाळी ७-८ वाजेपर्यंत थंडीचा जोर जास्त असतो. नंतर ऊन आणि दैनंदिन कामांची लगबग यामुळे थंडीचा त्रास सहन करता येतो. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. अमित शहांचा चेन्नई दौरा, तमिळनाडू विधानसभेची तयारी सुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा विकास योजनांच्या शुभारंभापेक्षा राजकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचा समजला जात आहे. भाजप  पुढच्या वर्षी असलेल्या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तयारी करत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर ?: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी केला. भाजपचा हा दावा म्हणजे राजकीय स्टंट आहे, या दाव्यात तथ्य नाही, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय म्हणाले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी