मुंबई: Top 5 News of the Day 24 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी नाशिकहून मुंबईकडे आलेल्या शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे देशातील नऊ राज्यांमध्ये पोल्ट्री फार्ममधील पक्षी बर्ड फ्लू या आजाराने बाधीत झाले आहेत तर १२ राज्यांमध्ये आकाशात उडणारे पक्षी बर्ड फ्लू या आजाराने बाधीत झाले आहेत. तिसरी महत्त्वाची बातमी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचा हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे.
चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या सचिवालयात घडलेली एक मोठी चूक नुकतीच समोर आली आहे जिथे मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेल्या फाईलशी छेडछाड करून त्यातला मजकूरच बदलण्यात आला आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे दहशतवादाला पाठिंबा आणि काश्मीरसारख्या अनेक मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अपमानित होणाऱ्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे आणि यावेळी हा झटका संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.