दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जानेवारी २०२१: राज्यपालांवर निशाणा ते NCPचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा

Headlines of the 25 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 25 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे. पण शेतकऱ्यांसाठी नाही. असं म्हणत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सिक्कीमच्या नाकू ला येथे चीनी सैन्याने आज (सोमवार) घुसखोरी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने याला जोरदार विरोधक करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. तिसरी महत्त्वाची बातमी धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप आणि त्यानंतरच्या राजकारणावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे.

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे ओमकार समुहाशी संबंधित दहा ठिकाणी इडीचे छापे पडल्यामुळे बांधकाम व्यवसायात खळबळ माजली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही: शरद पवार: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) संबोधित करताना राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. चिनी सैन्याशी पुन्हा एकदा झटापट, भारतीय जवानांनी घुसखोरी हाणून पाडली: लडाखच्या पूर्व भागात तणावादरम्यान चिनी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. परंतु भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा डाव हाणून पाडला आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, सिक्किमच्या नाकू लामध्ये भारतीय सैन्याची चिनी सैनिकांशी नाकू लाजवळ झडप झाली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. धनंजय मुंडेविरोधातील बलात्कार प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे: धनंजय मुंडे यांची चुलत बहीण आणि परळीतील राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र आजवर यावर धनंजय मुंडेवरील आरोपावर मौन बाळगले होते. आज पहिल्यांदा त्यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. अण्णा हजारेंच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा, हसन मुश्रीफांनी दिली माहिती: अण्णा हजारे यांचं ३० जानेवारीपासून आंदोलन सुरू होणारं असून आमचा त्यांना पाठिंबा असेलअशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. ओमकार समुहाच्या कार्यालयांवर इडीचे छापे: बांधकाम व्यवसायातील प्रतिष्ठीत समूह अशी ओळख असलेल्या ओमकार समुहाच्या (Omkar Group) तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) छापे टाकले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी