दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०: ड्रग्स प्रकरणातील मोठा खुलासा ते सुशांतप्रकरणी धक्कादायक दावा

Headlines of the 25 September 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 25 September 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी ड्रग्सप्रकरणी बॉलिवूडमधील बडे कलाकार हे नार्कोटिक्स ब्युरोच्या रडारवर आहेत. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याविषयी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) करत आहे आणि सुशांतच्या शविवच्छेदन अहवालाचा तपास एम्समधील विषेशज्ञ डॉक्टरांचे एक पथक करत आहे. तिसरी महत्त्वाची बातमी भारतीय जनता पार्टीच्या नाराज असलेल्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे  देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के पाटील यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. ड्रग्स प्रकरणातील मोठा खुलासा, दीपिका पदुकोण 'त्या' व्हाट्सअॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती: सूत्र: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. त्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती आता फार मोठी असल्याचं दिसून येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. धक्कादायक दावा : आत्महत्या नाही, गळा दाबून केली गेली सुशांत सिंह राजपूतची हत्या: सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी शुक्रवारी एक खळबळजनक दावा केला. विकास सिंह यांनी म्हटले की सुशांत सिंहने आत्महत्या केली नाही, तर गळा दाबून त्याचा खून करण्यात आला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. भाजपच्या 'या' माजी महिला आमदाराने घेतली अजित पवारांची भेट!: भारतीय जनता पार्टीचे (bharatiya janata party) जेष्ठ नेते एकानाथ खडसे (eknath khadse) हे भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्राचा प्रयत्न: 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे.' सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास घेतला: ज्येष्ठ गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचे आज (शुक्रवार) दुपारी १ वाजेच्या सुमारास निधन (passed away) झाले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी