दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ नोव्हेंबर २०२०: वन इलेक्शन ही काळाची गरज ते पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट  

Headlines of the 26 November 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 26 November 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी पंतप्रधान मोदी म्हणाले, काही महिन्यात कोणत्या तरी एका राज्यात निवडणुका असल्याने त्याचा परिणाम विकास कामावर होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी वन नेशन-वन इलेक्शन वर गंभीर अभ्यास आणि चर्चा करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यभरातील नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून हे बिल न भरण्याचे आवाहन मनसेने नागरिकांना केलं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैन्य दलाकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चालू झालेल्या राजकीय रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे व्हॉट्सअॅप आता फक्त एक मेसेजिंग अॅप राहिलेलं नाही. तर हे आता बँकेसारखे वापरता येणार आहे. याद्वारे आपण पैशांचा व्यवहार देखील करू शकता. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. वन नेशन, वन इलेक्शन ही काळाची गरज - पंतप्रधान मोदी: देशात एकाच वेळी निवडणुका ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. देशात काही महिन्याच्या अंतराने निवडणुका होत असल्याने देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. असं ते म्हणाले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. सरकारने वीज देयकांतून जिझिया कर लावला, काही झालं तरी वाढीव वीज बिल भरू नका: राज ठाकरे: वाढीव वीज बिलमध्ये सवलत देण्यास राज्य सरकार (Maharashtra Government)ने नकार दिल्यावर मनसेने (MNS) आक्रमक होत राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चा काढला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद: दहशतवाद्यांनी (Terrorirsts) भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. ‘शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला कारण...’, पुस्तकात नवा दावा: विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला  होता. मात्र त्यांनी आयत्यावेळी तो  बदलला. असा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. WhatsApp वरुन आता काही मिनिटांत पैसे करू शकता ट्रान्सफर, पाहा पैसे कसे करता येणार ट्रान्सफर:  WhatsApp सतत आपल्या यूजर्संना नवीन फीचर्स देत आहे. आता यूजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी