दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, २७ फेब्रुवारी २०२१: राज्यातील रुग्ण संख्येत वाढ ते कोविड प्रतिबंधक लसीची किंमत

Headlines of the 27 February 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 27 February 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी कोविड प्रतिबंधक लस खासगी रुग्णालयात किती रुपयांत उपलब्ध होणार याबाबत वृत्त समोर आलं आहे. दुसरी बातमी देशात कोरोना बाधितांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तिसरी बातमी मराठी भाषा दिनानिमित्त आज शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना मास्क न लावण्याबद्दल प्रश्न विचारला. चौथी बातमी मुंबई मनपा म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. पाचवी आणि शेवटची बातमी भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळणार नाही.

  1. कोविड लसीच्या एका डोसची किंमत 'इतके' रुपये असण्याची शक्यता : देशभरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध होणार असून त्याची किंमत किती असणार याबाबत सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात : देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे केरळमध्ये होते मात्र, आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ७२,५३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. राज ठाकरे यांना मास्क न लावल्याबद्दल पत्रकाराने विचारला प्रश्न, राज ठाकरेंनी म्हटलं... : मराठी भाषा दिनानिमित्त आज शिवाजी पार्कमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आज उपस्थिती लावली. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असूनही ठाकरे यांनी यावेळी मास्क लावलेला नव्हता. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना सातत्याने मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत जिथे त्यांचे चुलत भाऊ असलेले राज ठाकरे मात्र मास्क न घालता वावरत आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. मुंबई मनपा म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे का? - शेलार :  मुंबई मनपा म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. नगरसेवकांना विकसनिधीचे वाटप करताना मुंबई मनपात पक्षपात झाला आहे. हा पक्षपात आकडेवारीसह जाहीर करत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. चौथ्या कसोटीत बुमराह खेळणार नाही : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळणार नाही. जसप्रीत बुमराह याला वैयक्तिक कारणामुळे चौथ्या कसोटीत न खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय अमित शहा यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. हे प्रसिद्धी पत्रक बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी