दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ ऑक्टोबर २०२०: राज्य सरकारचा रेल्वेला प्रस्ताव ते स्मृती इराणींना कोरोना 

Headlines of the 28 October 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 28 October 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्य सरकारकडून टप्प्या-टप्प्याने वेळेनुसार प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जान कुमार सानू याच्या विरोधात मनसे-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून टाकल्या जात असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्याबद्दल त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक करणारं एक ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. Mumbai Local सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा रेल्वेला प्रस्ताव सादर, पाहा कसा आहे हा प्रस्ताव: आता सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, राज्य सरकारने (Maharashtra government) आता रेल्वेला एक पत्र लिहिलं असून त्याद्वारे सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतची मागणी केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. मनसे-शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर कलर्स वाहिनीचा माफीनामा, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर: जान कुमार सानू याने केलेल्या मराठीच्या अवमानानंतर त्याच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena)-मनसे (MNS)सह सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली. तसेच शूटिंग बंद पाडू असा इशाराही कलर्स वाहिनीला देण्यात आला होता. त्यानंतर आता कलर्स वाहिनी (Colors Channel)कडून आपला माफीनामा सादर करण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून : शरद पवार: राज्य सरकार कडून जास्त अपेक्षा करू नये , कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही, व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. असं वक्तव्य शरद पवार यांनी केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?, 'त्या' ट्वीटमुळे तुफान चर्चा!:  भाजपच्या माजी मंत्री आणि राज्यातील मोठ्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल (मंगळवार) केलेल्या एका ट्वीटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी