मुंबई: Top 5 News of the Day 29 November 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी छत्तीसगडच्या सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे कोब्रा बटालियनचे सहाय्यक कमांडेंट शहीद झाले आहेत. या हल्ल्यात अन्य सात जवानही जखमी झाले आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूरचे पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याची एका ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. तिसरी महत्त्वाची बातमी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या वादळी घडामोडींनंतर स्थापन झालेल्या उद्धव ठाकरे सरकारने नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली. ‘तोकड्या तलवारीची लढाई’ या रोखठोक लेखातून संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या वन-डे सीरिजमधील दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.