दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ ऑक्टोबर २०२०: मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय ते राणेंविरोधात पोलीस तक्रार

Headlines of the 29 October 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 29 October 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. पाहा कोणते महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी मुंबईतील दहिसर भागात असलेल्या कांदरपाडा आयसीयू केंद्रात लागलेली आग रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वेळीच विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांना असलेलं समर्थन यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. त्यानंतर आता स्वत: पाकिस्तानच्या मंत्र्यानेच दहशतवादी हल्ल्याची कबुली दिली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांनी आपल्या ब्रिटीश मैत्रिणीशी लंडनमधील एका चर्चमध्ये लग्नगाठ बांधली. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. मंत्रिमंडळ निर्णय, २९ ऑक्टोबर २०२०: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वपूर्ण निर्णय: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल, मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली:  भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. VIDEO: मुंबईत कोविड रुग्णालयातील आग परिचारिकेने विझवली, प्रसंगावधान दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव: मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर (Dahisar) येथील कोविड रुग्णालयात (Covid10 Hospital) अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. VIDEO: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड, पुलवामा हल्ल्याची दिली कबुली: पाकिस्तान (Pakistan)कडून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. तर पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला विरोधात असल्याचा दावा करत आलं आहे. पण आता पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पाहा PHOTOS : वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी केले दुसरे लग्न, ब्रिटीश मैत्रिणीशी केला विवाह: माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे(harish salve) यांची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. वकील हरिश साळवे यांनी दुसरे लग्न(second marriage) केले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी