दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ ऑगस्ट २०२०: भिडेंची शरद पवारांवर टीका ते सोने-चांदीचं उड्डाण कायम

Headlines of the 3 August 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 3 August 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी 'शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे. अशी टीका शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राखी पौर्णिमेच्या सणादिवशीच बंधू शंकर नलावडे यांना जीवदान मिळणार आहे. सविता भोसले असं स्वतःच यकृत देणाऱ्या बहिणीचे नाव असून आहे. बहिणीने भावासाठी स्वतःच यकृत देऊन जीवदान दिल्याने सर्वत्र सावित्री भोसले या बहिणीचे कौतुक केले जात आहे. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याचवेळी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेला कोरोनाचं भान ठेऊन घरोघरी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे  सध्‍याच्‍या ‘कोरोना कोविड २०१९’ च्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍य सरकारतर्फे अनेक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘वांद्रे जत्रौत्‍सव – २०२०’ (आई माऊंट मेरी जत्रा) संपन्‍न होण्‍याकरिता वाटप करण्‍यात येणाऱया पि‍चेसची प्रक्रि‍या स्‍थगित करण्‍यात आली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे  रक्षाबंधनाच्या दिवशी सराफा बाजारात सोने ८ रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढून ५४ हजारावर खुले झाले. तर चांदीने प्रति किलो ९४२ रुपयांची उसळी घेतली. सुरूवातीच्या वाढीनंतर सोन्याचा भाव कमी झाला. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर. 

  1. Sambhaji Bhide on Sharad Pawar : भिडे गुरूजींनी केली शरद पवारांवर अशी टीका: 'शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. अशी टीका शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. रक्षाबंधनाला बहिणीने भावाला यकृत गिफ्ट करून, खऱ्या अर्थाने राखीपौर्णिमा केली साजरी: एका बहिणीने आपल्या भावासाठी राखीच्या बदल्यात स्वतःच यकृत (liver transplant) देऊन भावाला जीवदान देण्यासाठी भावाच्या पाठीमागे बहिण उभी राहिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. 'त्या दिवशी' घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा: चंद्रकांत पाटील: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी (Ram Mandir) समारंभ ५ ऑगस्ट २०२० (5th August) रोजी पार पडणार आहे. याच निमित्ताने आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक वेगळं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Mount Merry Festival: कोरोनामुळे माऊंटमेरी जत्रेतील ही प्रक्रिया नाही होणार: बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनातर्फे (BMC) मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या दुसऱ्या रविवारपासून तिसऱ्या रविवारपर्यंत ‘वांद्रे जत्रौत्‍सव’  (Bandra Festival) (आई माऊंट मेरी जत्रा) भरविण्‍यात येते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सोने चांदी आजचा भाव, ३ ऑगस्ट २०२०:  रक्षाबंधनलाही सोने-चांदी उड्डाण कायम, फटाफट चेक करा ३ ऑगस्टचा भाव: सोने आणि चांदीच्या किंमतीत  (Gold Rate)वाढ कायम आहे.  ऑगस्टच्या पहिल्या कारोबारी दिवसात सोमवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या हाजिर भावात तेजी दिसून आली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी