दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, ३ मार्च २०२१: विधानसभेत मुख्यमंत्री गरजले ते राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ

Headlines of the 3 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 3 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी विरोधकांचे केल्या हल्ल्यांना उत्तरांनी केली. दुसरी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पलटवार केला आहे. तिसरी बातमी जळगावातील वसतिगृहात घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरलं. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. चौथी बातमी भारतात लोक टॅक्सपासून बचाव करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. इतकं की परदेशातही लोक आपली संपत्ती लपवून ठेवतात. आता त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. पाचवी आणि शेवटची बातमी आज राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

  1. विधानसभेत उद्धव ठाकरे गरजले : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी  विरोधकांचे केल्या हल्ल्यांना उत्तरांनी केली.  पहिल्यांदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोपरखळ्या, नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना तशाच शब्दांत उत्तरे, कोव्हिडच्या काळातली सरकारची कामगिरी अशा मोठ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. 'खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार' : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन, हिंदुत्व, मोटेरा स्टेडियमचे नामांतर यासोबतच इतरही मुद्दयांवरुन मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत भाजपला टोले लगावले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना ठाकरे सरकारवर पलटवार केल्याचं पहायला मिळालं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. 'असं सरकार हवंय कशाला? राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही' : जळगाव जिल्ह्यातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पुरुषांनी आणि पोलिसांनी तेथील महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. १ मार्च रोजी घडलेल्या या घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्यात असं सरकार हवंय कशाला? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. टॅक्स चुकवेगिरी करणाऱ्यांवर सरकारची नजर, पकडले गेल्यास १० वर्षांची शिक्षा : सरकारकडे जमा होणाऱ्या टॅक्सपासून कसा बचाव करता येईल यासाठी लोक विविध शक्कल लढवत असतात. काहीजण तर आपली संपत्ती परदेशात लपवून ठेवतात.. मात्र अशा लोकांवर आता मोठी कारवाई होणार आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना म्हटले जाते की परदेशात काळा पैसा लपवला आहे. लवकरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट काळा पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंट ४००हून अधिक लोकांवर काळा पैसा कायद्यांतर्गत कारवाई करणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. आज ९,८५५ नवीन रुग्णांचे निदान : महाराष्ट्रात आज ६,५५९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७७% एवढे झाले आहे. आज राज्यात ९,८५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी