दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ जुलै २०२०: राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य ते विमान सेवा ३१ ऑगस्टपर्यंत बंद

Headlines of the 31 July 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 31 July 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. त्या तीन पक्षात कोणताही ताळमेळ नाही दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सक्तववसुली संचालनालयाने प्राथमिक माहिती घेऊन आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या विरूद्ध अटकेसाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दोघांवर ऑनलाइन सट्टेबाजी प्रमोट केल्याचा आरोप आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय डीजीसीएने जाहीर केला. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर. 

  1. raj thackeray :  राज्यातील ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत, राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य: राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये (Maharashtra Vikas Aghadi) कोणताही संवाद नाही. असं  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) म्हणाले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण तपासात राज्यातील एका मंत्र्याचा दबाव: भाजपबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide Case) दररोज नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी (CBI Inquiry) करण्याची मागणीही होताना दिसत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. सुशांत प्रकरणात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा, रियाची चौकशी होणार: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता वेगाने नवनवी माहिती हाती येत आहे. सुशांतने सुरू केलेल्या कंपन्यांमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब आर्थिक अफरातफर करत होते का, याची चौकशी होणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. विराट कोहली आणि तमन्ना भाटियाला अटक करण्याची मागणी, मद्रास हायकोर्टात याचिका दाखल: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली  (Virat Kohli)आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( tamannah bhatia) यांच्या विरूद्ध अटकेसाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय (Intnl commercial passenger flights suspended till 31st Aug) डीजीसीएने जाहीर केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी