दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ मार्च २०२१: परमबीर सिंग यांना कोर्टाने फटकारलं ते लग्नसराईत सोनं झालं स्वस्त

Headlines of the 31 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 31 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने परमबीर सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. दुसरी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. येत्या ८ ते १० दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिसरी बातमी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे. यामुळे आधार - पॅन कार्ड लिंक न केलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौथी बातमी राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे यामुळे राज्याची चिंता आणखी वाढली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे.

  1. Param Bir Singh यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या प्रकरणी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. राजेश टोपे यांनी दिली पवारांच्या प्रकृतीची माहिती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल  पित्ताशयासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, येत्या ८ ते १० दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. आधार-पॅन लिंक करण्यास मुदतवाढ : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची आज (३१ मार्च २०२१) ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली होती. शेवटची तारीख असल्याने नागरिकांची आधार-पॅन लिंक करण्यासाठी झुंबड उडाली होती आणि परिणामी इन्कम टॅक्स वेबसाईट क्रॅश झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता आयकर विभागाने आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना आधार-पॅन लिंक करता येणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. राज्यातील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी : महाराष्ट्र आज २३,६०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३४% एवढे झाले आहे. आज राज्यात ३९,५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. लग्नसराईत सोन्याच्या किंमती घसरल्या : बुधवारी सोने-चांदीच्या किंमतीत घट झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४९ रुपयांची घट झाली. यामुळे राष्ट्रीय राजधानीत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,९२५ रुपयांवर राहिली. मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,९७४ रुपये होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी