दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ४ डिसेंबर २०२०: शास्त्रज्ञांचा हिरवा कंदील मिळताच कोरोना लसीकरण ते भारताचा विजय

Headlines of the 4 December 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 4 December 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी आज कोरोना व्हायरसच्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दुसरी बातमी राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. तिसरी बातमी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन आता चिघळले असल्याचं दिसत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भारत बंदची हाक दिली आहे. चौथी बातमी सिनेमाच्या सेटवर कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याचे वृत्त समोर आले असून सेटवरील १९ जणांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.

  1. पुढील काही आठवड्यात लस तयार होईल, शास्त्रज्ञांचा हिरवा कंदील मिळताच लसीकरण : पंतप्रधान : कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड लसीच्या लसीकरणावर राज्य आणि केंद्र सरकार एकत्र मिळून काम करत आहेत. कोविड लस येत्या काही आठवड्यांत तयार होईल आणि शास्त्रज्ञांनी हिरवा कंदील देताच लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात केली जाईल. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. शिक्षक, पदवीधरमध्ये  महाविकास आघाडीला यश, भाजपचा पराभव : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. शेतकरी आंदोलन चिघळले, शेतकऱ्यांकडून 'भारत बंद'ची हाक : केंद्र सरकारने लागू गेलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. दिल्लीमध्ये सुरू असलेले हे आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. विज्ञान भवन येथे शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि कृषिमंत्री यांच्यात चर्चेनंतरही तोडगा निघत नसल्याचं दिसत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. 'जुग जुग जिओ'च्या सेटवर कोरोनाचे थैमान : 'जुग जुग जिओ' सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याचे वृत्त आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता आणि प्रमुख कलाकारांना कोरोना झाला. वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, वन-डेमधील पराभवाचा वचपा काढला : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच टीम इंडियाने जिंकली आहे. टी-20 सीरिजमधील पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 150 रन्सपर्यंत मजल मारता आली आणि टीम इंडियाने ही मॅच 11 रन्सने जिंकली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी