दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, ४ मार्च २०२१: ....तर पेट्रोल ७५ रुपये लिटर होईल ते पहिला दिवस टीम इंडियाचा

Headlines of the 4 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 4 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत असा आरोप भाजपने केला आहे. दुसरी बातमी आज राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. तिसरी बातमी गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ होताना दिसत आहे. शंभरी गाठलेला पेट्रोलचा दर खूपच स्वस्त होण्याचा मार्ग आता सांगण्यात आला आहे. चौथी बातमी भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सने उत्कृष्ट कामगिरी केली. पाचवी आणि शेवटची बातमी विंडीजचा कर्णधार पोलार्डने श्रीलंकेचा स्पिन गोलंदाज अकिला धनंजयच्या एका ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारले. 

  1. मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग : मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच आज सभागृहात उघड केले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. आज ८९९८ नवीन रुग्णांचे निदान, ६१३५ कोरोनामुक्त : महाराष्ट्रात आज ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६% एवढे झाले आहे. आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. ....तर पेट्रोल प्रति लिटर ७५ रुपये होईल, डिझेलही होईल खूपच स्वस्त : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. शंभरी गाठलेल्या पेट्रोलचा भाव कमी होऊ शकतो आणि त्यावर उपायही सांगण्यात आला आहे. पेट्रोल जर जीएसटीच्या कक्षेत आणले तर त्याची किरकोळ किंमत ७५ रुपये प्रति लिटर इतकी होऊ शकते. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. पहिल्या दिवशी इंग्लंड 205 रन्सवर ऑल आऊट : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (4 मार्च 2021) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली. मॅचचा पहिला दिवस टीम इंडियाने आपल्या नावावर केला. टीम इंडियाच्या बॉलर्सने जबरदस्त बॉलिंग करत इंग्लंडच्या टीमला 205 रन्सवर ऑलआऊट केलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. ६ चेंडूत ६ षटकार ठोकत पोलार्डने केली युवराजच्या रेकॉर्डशी बरोबरी : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्याील अंटिगा येथे टी-२० सामना खेळला जात आहे. यात विंडीजचा कर्णधार किरेन पोलार्डने अशी कामगिरी केली की ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला कॅरेबियन खेळाडू ठरला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी