दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, ५ मार्च २०२१: 'त्या' गाडी मालकाचा मृत्यू ते राज्यात १०२१६ नवीन रुग्णांचे निदान

Headlines of the 5 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 5 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मालकाचा मृतदेह आढळून आला आहे. दुसरी बातमी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर आता त्यांच्या पत्नी विमल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिसरी बातमी महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज १० हजारांहून अधिक नवीन रुग्णांचे निदान झाले आहे त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. चौथी बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि इयत्ता १२वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली. पाचवी आणि शेवटची बातमी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

  1. अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मालकाचा मृतदेह आढळून आला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. "पोलिसांना भेटायला जातो म्हणून गेले आणि परतलेच नाही", मनसुख हिरेन यांच्या पत्नीची प्रतिक्रिया : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नीने म्हटलं, आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी झाली होती. पोलिसांचा चौकशीसाठी कॉल येत होता आणि माझे पती पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जात होते. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केलं. मनसुख हिरेन आत्महत्या करुच शकत नाही. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. चिंता वाढली, आज १० हजारांहून अधिक बाधितांची नोंद : महाराष्ट्रात आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. सोने स्वस्त झाले, चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले : शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरात १० ग्रॅम ५२२ रुपयांनी घट दिसून आली. यामुळे दिल्लीत पिवळ्या धातूची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,८८७ रुपयांवर आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी