दिवसभरातील ५जबरदस्त बातम्या, ६ मार्च २०२१: टीम इंडियाचा विजय ते मनसुख हिरेन यांचे पत्र आले समोर

Headlines of the 6 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 6 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मनसुख हिरेन यांनी मृत्यू पूर्वी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिसांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. दुसरी बातमी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील चौथ्या मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. तिसरी बातमी इंग्लंड विरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. चौथी बातमी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी ड्रायव्हिंग लायसेन्स आणि सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन सेवा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना आरटीओच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.

  1. मानसिक छळ थांबवा, मनसुख हिरेन यांनी पत्रातून CMकडे केलेली मागणी : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणाला एक पत्र उघड झाल्यामुळे धक्कादायक वळण लागले आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उघड झालेल्या पत्रामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. टीम इंडियाचा इंग्लंडवर एक इनिंग आणि 25 रन्सने विजय : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचवर भारताने वर्चस्व मिळवलं. टीम इंडियाने ही मॅच एक इनिंग आणि 25 रन्सने जिंकली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची टीम 135 रन्सवर ऑल आऊट झाली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. भारत आणि न्यूझीलंड लॉर्ड्सवर आमनेसामने : इंग्लंड विरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम कसोटी सामना रंगणार. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता होणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ : महाराष्ट्रात आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३६% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. Driving License आणि RC सेवा ऑनलाईन : रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून वाहन चालक परवाना आणि सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन सेवा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना आरटीओच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी