दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ एप्रिल २०२१: कोरोना ते लसीकरणावरुन राजकारण

Headlines of the 7 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news top 5 news 7 April 2021 latest update
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ एप्रिल २०२१: कोरोना ते लसीकरणावरुन राजकारण
  • नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास
  • सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी, वाझे प्रकरणात पुढे आले अनिल परबांचे नाव

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण ही आजच्या दिवसातील पहिली महत्त्वाची बातमी आहे. सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी आणि वाझे प्रकरणात पुढे आले अनिल परबांचे नाव ही आजच्या दिवसातील दुसरी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातले नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास ही आजच्या दिवसातील तिसरी महत्त्वाची बातमी आहे. कोरोना लसीकरणावरुन रंगले राजकारण ही आजच्या दिवसातील चौथी महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल बॅंकिंगसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे महत्त्वाचे निर्णय ही आजच्या दिवसातील पाचवी महत्त्वाची बातमी आहे.

  1. महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण : महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांमध्ये राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  2. सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी, वाझे प्रकरणात पुढे आले अनिल परबांचे नाव : मुंबई पोलीस दलातून निलंबित झालेल्या सचिन वाझे याला ९ एप्रिल २०२१ पर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचा आदेश एनआयए कोर्टाने दिला. सुनावणी सुरू असताना वाझेने कोर्टात एक पत्र दिले. या नंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझेने पत्रात केलेले वसुलीचे आरोप फेटाळले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  3. नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास : वाढत्या कोरोना संकटामुळे महाराष्ट्र शासनाने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  4. कोरोना लसीकरणावरुन रंगले राजकारण : देशातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५७ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पण राजकारण्यांना कुरघोडीचे राजकारण करण्यातून उसंत घ्यावीशी वाटत नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  5. डिजिटल बॅंकिंगसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या तुमच्यावर होणारा परिणाम : रिझर्व्ह बॅंकेने पेमेंट्स बॅंकांमधील खात्यातील कमाल मर्यादा २ लाखांवर नेली आहे. आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधा पेमेंट्स बॅंकांना खुल्या केल्याने ग्राहकांना होणार फायदा. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी