दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०१ नोव्हेंबर २०२१: वाझे आता मुंबई पोलिसांचा कोठडीत जाणार ते कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियात मंजुरी

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 01, 2021 | 21:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 01 November 2021 ।  Headlines of the 01 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 01 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०१ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • परदेशी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया हा पर्याय निवडणाऱ्या आशिया खंडातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे
  • दिवाळीनंतर भाजप नवाब मलिकबाबत करणार गौप्यस्फोट
  • भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.

Whole Day Top 5 News 01 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 01 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी सचिन वाझे आता मुंबई पोलिसांच्य कोठडीत जाणार असल्याची आहे. आजची दुसरी बातमी फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल केल्याची आहे. आजची तिसरी बातमी जगातील उपासमारी मिटण्यासाठी मस्क यांनी आर्थिक मदत केल्याची आहे. आजची चौथी बातमी पंकजा मुंडे यांचा फडणवीसांना पाठिंबा दिल्याची आहे. आजची पाचवी बातमी कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियात मंजुरी मिळाल्याची आहे. 

  1. Sachin Waze in police custody सचिन वाझे आता मुंबई पोलिसांच्या कोठडीत : Sachin Waze in Mumbai Police Crime Branch Custody Till 6 November 2021 । मुंबईः मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेल्या सचिन वाझे याला क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले आणि कोर्टात हजर केले. कोर्टाने वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. यामुळे सचिन वाझे आता ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत असेल. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Devendra Fadnavis VS Nawab Malik: फडणवीसांचा पलटवार, म्हणाले- दिवाळीनंतर भाजप बॉम्ब फोडणार, नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार! : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे विद्यमान अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, "खिसियानी बिल्ली खंभा नोचे" सध्या नवाब मलिक यांचीही अवस्था झाली आहे. फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी एक फुलबाजी लावली आहे. भाजप दिवाळीनंतर धमाका करणार असल्याचे म्हटले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Elon Musk | जगातील उपासमारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरसावले मस्क, सहा अब्ज डॉलर युनोला देण्यास तयार :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) जगातील उपासमारीच्या प्रश्नावर पुढे सरसावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर मस्क यांनी हे उत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीच्या (Elon Musk Wealth) फक्त २ टक्के खर्च केल्यास जगातील उपासमारी (Global Hunger problem)संपू शकते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Pankaja Munde Support Devendra Fadanvis : पंकजा मुंडेंनी केली फडणवीसांना दिला पाठिंबा, हा आहे मुद्दा..  ; ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पण  पक्षांतर्गत धुसफुसीने चर्चेत असलेल्या  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Australia recognises Covaxin भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठे यश, कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाची मंजुरी : भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसला ऑस्ट्रेलियाने मंजुरी दिली. या मंजुरीमुळे कोवॅक्सिन लसचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियात जाणे शक्य होणार आहे. अनेक देशांनी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसला मंजुरी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी