दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ नोव्हेंबर २०२१: अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी ते अजित पवारांच्या संपत्तीवर आयकर विभागाची कारवाई

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 02, 2021 | 20:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 02 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 02 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 02 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ नोव्हेंबर २०२१:  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ईडी चौकशी करेल त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलाला तिथे हजर राहता येईल
  • मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान अधिक ताकद वाढली.
  • अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागाची छापेमारी

Whole Day Top 5 News 02 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 02 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी अनिल देशमुखांसंदर्भातील आहे. आजची दुसरी बातमी पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा दणका बसल्याची आहे. आजची तिसरी बातमी पर्यावरणासंदर्भातील आहे. आजची चौथी बातमी भारत आणि चीनच्या सीमेरेषेजवळ भारतीय लष्कराचा युद्ध सराव केल्याची आहे. आजची पाचवी बातमी अजित पवार यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईची आहे. 

  1. Anil Deshmukh अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी : विशेष पीएमएलए कोर्टाने खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. ईडीने देशमुखांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. By Election Result Trend: पोटनिवडणुकीत मोदींना दणका, जाणून घ्या कोणाला धक्का आणि प्रोत्साहन : दुपारपर्यंतच्या 3 लोकसभा आणि 29 विधानसभा जागांच्या ट्रेंडवरून हे स्पष्ट झाले आहे की यावेळी हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधील जनता केंद्रात सत्तेत बसलेल्या भाजपला नवा संदेश देत आहे. हिमाचलमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. तिथे पक्ष मंडी लोकसभा जागेवरच पिछाडीवर आहे, तर तिन्ही विधानसभेच्या जागांवर पिछाडीवर आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Climate Change | जगातील वायु प्रदूषण धोक्याच्या पातळीवर, भारताची धोक्याची घंटा : सध्या सर्व जग पर्यावरण आणि हवामान बदलाच्या (Climate Change) गंभीर प्रश्नावर चिंतन करते आहे. अशा परिस्थितीत भारतातील पर्यावरण आणि हवामान बदलाच्या विविध घटकाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात सातत्याने वायु प्रदूषण (Air pollution) वाढते आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. India-China : LACवर भारताचा चौदा हजार फुटांवर युद्धाभ्यास, चीनला इशारा : भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control - LAC) चौदा हजार फुटांच्या उंचीवर युद्धाभ्यास करुन चीनला इशारा दिला आहे. हा युद्धाभ्यास सोमवार १ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Notice to Ajit Pawar from Income Tax Department : आजचा दिवस दादांचा ! आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटीस, १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने अटक केली. या पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच आज सकाळी महाविकास आघाडी सरकारला(Mahavikas Aghadi Sarkar) दुसरा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई सुरू केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी