दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०३ नोव्हेंबर २०२१: कोवॅक्सिनला WHOची मंजुरी ते बाबर आझमचा नवा विक्रम

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 03, 2021 | 22:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 03 November 2021 : Headlines of the 03 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 03 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०३ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एका वर्षात टी-२० फॉरमॅटमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला कर्णधार बनला आहे.
  • गरीब देशांना भारताकडून लसीकरण मोहिमेसाठी लसच्या स्वरुपात मदत मिळू शकेल
  • समीर वानखेडे यांना काही व्यक्ती आणि संस्थांकडून भक्कम पाठिंबा

Whole Day Top 5 News 03 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 03 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी कोवॅक्सिनला WHOची मंजुरी मिळाल्याची आहे. आजची दुसरी बातमी समीर वानखेडे यांना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने पाठिंबा दिल्याची आहे.  आजची तिसरी बातमी  क्रुझ ड्रग्स प्रकरणात सॅम डिसोझाने केलेल्या  नवा दाव्याची  आहे.  आजची चौथी बातमी समीर वानखेडे यांच्याकडील संपत्तीविषयी माहिती देणारी आहे. आजची पाचवी बातमी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमच्या नव्या विक्रमाची आहे. 

  1. COVAXIN कोविशिल्ड पाठोपाठ कोवॅक्सिनला WHOची मंजुरी : भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड (Covishield) पाठोपाठ कोवॅक्सिन (COVAXIN) या कोरोना प्रतिबंधक लसला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाली. या मंजुरीमुळे आता भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस जगभर निर्यात करणे तसेच गरीब देशांना लसीकरण कार्यक्रमासाठी मदत करणे भारताला सोपे होणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. sameer wankhede समीर वानखेडेंना 'यांनी' दिला भक्कम पाठिंबा : महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपांची राळ उडवत आहे. पण समीर वानखेडे यांना काही व्यक्ती आणि संस्थांकडून भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. गोसावीच्या मोबाईलमधील समीर वानखेडे हा प्रभाकर साईल, सॅम डिसोझाचा नवा दावा :  क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (cruise Drugs case) दररोज नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात नाव समोर आलेल्या सॅम डिसोझाने (Sam D'Souza ) मोठा दावा केला आहे. आर्यन खान (Aryan Khan) कडून कोणतेही ड्रग्ज जप्त न केल्याचा दावा केला आहे. किरण गोसावी (Kiran Gosavi) यांना पैशांचा व्यवहार करायचा होता असेही सॅमने यांनी सांगितले. सुनील नावाच्या व्यक्तीला गोसावी यांच्याकडून सूचना मिळत असल्याचा दावाही सॅम डिसोझा यांनी केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Sameer Wankhede Wealth : एकूण किती संपती आहे समीर वानखेडेंकडे, जमीन, फ्लॅट पाहा संपूर्ण माहिती...  : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे NCB चे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) सध्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) दररोज गंभीर आरोप करत आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. babar vs virat: बाबर आझमने पुन्हा विराटला टाकले मागे : कर्णधार बाबर आझमच्या(captain babar azam) नेतृत्वाखाली पाकिस्तानने(pakistan) रविवारी टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 world cup) सुपर १२ राऊंडमध्ये नामिबियाला सोप्या पद्धतीने ४५ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. संघाला विजय मिळवून देण्यात बाबरने महत्त्वाची भूमिका साकारली. त्याने ४९ चेंडूत ७० धावांची जबरदस्त खेळी केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी