दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ नोव्हेंबर २०२१: पंतप्रधान मोदींनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी ते मोदींची केदारनाथ यात्रा

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 04, 2021 | 21:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 04 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ नोव्हेंबर २०२१
Whole Day Top 5 News 04 November 2021   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत.
  • कर सवलती रद्द करणार असलेल्या ३२ देशांमध्ये युरोपमधील २७ देश
  • केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील

Whole Day Top 5 News 04 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 04 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याची आहे. आजची दुसरी बातमी चीनच्या ट्रेडविषयीची आहे. आजची तिसरी बातमी नऊ राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचे आहे.  आजची चौथी बातमी साऊथ अॅक्टर विजय सेतुपतीवर हल्ला झाल्याची आहे. आजची पाचवी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदरनाथ दौऱ्याविषयी आहे. 

  1. PM Modi interacts with soldiers : सर्जिकल स्ट्राइकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला गर्व, नौशेरामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जवानांशी संवाद : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सीमेवर तैनात (Deployed ) जवानांना (soldiers ) भेट घेऊन दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी (Diwali) साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. China Trade : चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार ३२ देश : चीनला दिलेल्या कर सवलती १ डिसेंबर २०२१ पासून रद्द करणार किंवा त्यात मोठ्या प्रमाणात कपात करणार अशा स्वरुपाची घोषणा जगातील ३२ देशांनी केली आहे. आर्थिक प्रगतीची संधी मिळावी यासाठी १९७८ पासून अनेक देश चीनला कर सवलती देत आहेत. सध्या जगातील ४० पेक्षा जास्त देश चीनला मोठ्या प्रमाणावर कर सवलती देत आहेत. या देशांपैकी ३२ देशांनी चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार किंवा त्यात मोठ्या प्रमाणात कपात करणार अशा स्वरुपाची घोषणा केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Petrol Diesel Rate : नऊ राज्यांनी स्वस्त केलं पेट्रोल-डिझेल; महाराष्टातील लोकांनी मिळणार का दिलासा? सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष : केंद्र सरकारने (Central Government) प्रति लिटर पेट्रोलमागे (Petrol) 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे (Diesel) 10 रुपये कमी केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या आणि डिझेलवरच्या उत्पादन क्षुल्कामध्ये कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. आता राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी असेही आवाहन केंद्राकडून करण्यात आले असून त्याला भाजपशासित (BJP ruled) नऊ राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. vijay sethupathi attacked : बंगळुरू विमानतळावर अभिनेता विजय सेतुपतीवर अचानक हल्ला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या  विजय सेतुपती यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगळुरू विमानतळावर एका व्यक्तीने अभिनेत्यावर अचानक हल्ला केला, त्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विजय सेतुपतीशी संबंधित हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. PM Modi मोदींची शुक्रवारी केदारनाथ यात्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (बलिप्रतिपदा) केदारनाथ यात्रा करणार आहेत. केदारनाथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील. नंतर केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी