दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०५ नोव्हेंबर २०२१: आर्यन खान प्रकरणातून वानखेडेंची हकालपट्टी ते सूर्यवंशी चित्रपटाची कमाई

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 05, 2021 | 20:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 05 November 2021 । Headlines of the 05 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 05 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०५ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमार स्टारर सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर 30-35 कोटी रुपये कमवू शकतो
  • जीएसटीचा पैसा आला तर इंधन दर कपात शक्य
  • दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील. - नारायण राणे

Whole Day Top 5 News 05 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 05 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी समीर वानखेडेंच्या संदर्भातील आहे. आजची दुसरी बातमी पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्याविषयीची आहे. आजची तिसरी बातमी नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याची आहे. आजची चौथी बातमी शरद पवार यांनी पेट्रोल-डिझेलच्या दराविषयी केलेल्या वक्तव्याविषयीची आहे. आजची पाचवी बातमी सूर्यवंशीची चित्रपटाच्या कमाईची आहे. 

  1. Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी या ड्रग्स प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. PM Modi in Kedarnath : पंतप्रधान मोदींनी केलं आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण, काही वेळात सुरू होईल भाषण : पंतप्रधान झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) ५व्यांदा केदारनाथ (Kedarnath) दौऱ्यावर आहेत. पहिल्या कार्यकाळात ते चार वेळा केदारनाथला गेले होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Narayan Rane Press Conference : पाडव्याच्या दिवशी राणेंची आतिषबाजी; मुख्यमंत्री, शरद पवार, नवाब मलिकांवर हल्लाबोल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी बारामती (Baramati) दौऱ्यावर गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी बारामतीचं कौतुक करताना विरोधकांवर हल्ला चढवला. फटाके वाजवा पण धूर सोडू नका, असं ते म्हणाले होते. हाच धागा पकडत आज केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री (Union Minister for Micro, Small and Medium Enterprises ) नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. राज्याचा जीएसटीचा पैसा आला तर इंधन दर कपात; ईडी अन् दादांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा डिफेन्स गेम : बारामती (Baramati )येथे दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब (Pawar family) एकत्र आले. या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेहमी प्रमाणे डिफेन्स गेम खेळत वेळ मारून नेली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Sooryavanshi Box Office Prediction : रिलिज होण्यापूर्वी सूर्यवंशीची बॉक्स ऑफिसवर इतके कोटींची कमाई, ओपनिंग डे कलेक्शनबाबत अनेक अपेक्षा :  रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बरीच प्रतीक्षा केली आहे. कोरोनामुळे, सूर्यवंशी 2 वर्षांपासून प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे सूर्यवंशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी