दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ नोव्हेंबर २०२१: अहमदनगरच्या हॉस्पिटलला आग ते देशमुखांना न्यायालयीन कोठडी

Whole Day Top 5 News 06 November 2021 । Headlines of the 06 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 06 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ नोव्हेंबर २०२१: अहमदनगरच्या हॉस्पिटलला आग ते देशमुखांना न्यायालयीन कोठडी
  • महाराष्ट्रात १४,७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज ठाकरे आता शिवतीर्थ येथे राहणार!

Whole Day Top 5 News 06 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 06 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी अहमदनगरच्या हॉस्पिटलला लागलेल्या आगीची. आजची दुसरी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची. आजची तिसरी बातमी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या नव्या घराची. आजची चौथी बातमी ठाकरे सरकारने इंधनदरात सवलत द्यावी या विरोधकांच्या मागणीची. आजची पाचवी बातमी अनिल देशमुखांना दिलेल्या न्यायालयीन कोठडीची.

चीनमध्ये घरोघरी सुरू आहे साठेबाजी, युद्ध किंवा मोठ्या लॉकडाऊनची तयारी

या कंपनीची बिस्किटे खाण्याऐवजी शेअर विकत घेतले असते तर सोन्याच्या बिस्किटांमध्ये खेळला असता !

  1. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला आग, ११ ठार : Fire at ahmadnagar civil hospital 11 dead अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (Intensive Care Unit - ICU / अतिदक्षता विभाग) विभागाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात १४,७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 6 November 2021 । महाराष्ट्रात आढळलेल्या ६६ लाख १६ हजार ७६२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५८ हजार ४५ जण बरे झाले. राज्यात सध्या १४ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. राज ठाकरे आता शिवतीर्थ येथे राहणार! : Raj Thackeray moves into new home 'Shivtirth' in Shivaji Park मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यात बदल झाला आहे. राज ठाकरे आता कृष्णकुंज या इमारतीत नाही तर स्वतःच्या मालकीच्या शिवतीर्थ या पाच मजली इमारतीत राहणार आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात सवलत द्यावी - भाजपा : BJP slams Maharashtra govt for not cutting VAT on petrol and diesel मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे - चंद्रकांत पाटील सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी तर सचिन वाझेला पोलीस कोठडी : Judicial Custody to Anil Deshmukh and Police Custody to Sachin Waze खंडणी वसुली आणि पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी