दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ नोव्हेंबर २०२१: पाकिस्तानचा गोळीबार ते देशमुखांना ईडी कोठडी

Whole Day Top 5 News 07 November 2021 । Headlines of the 07 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 07 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ नोव्हेंबर २०२१: पाकिस्तानचा गोळीबार ते देशमुखांना ईडी कोठडी
  • मासेमारीसाठी गेलेल्या पालघरच्या माणसाची पाकिस्तानने केली हत्या
  • NCB SIT ने आर्यन खानसह ७ जणांना बजावले समन्स

Whole Day Top 5 News 07 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 07 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी पाकिस्तानच्या समुद्रातील गोळीबाराची. आजची दुसरी बातमी आर्यनसह सात जणांना एनसीबीच्या एसआयटीने बजावलेल्या समन्सची. आजची तिसरी बातमी कार्तिकी यात्रेच्या नियमावलीची. आजची चौथी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची. आजची पाचवी बातमी अनिल देशमुख यांना मिळालेल्या ईडीच्या कोठडीची.

  1. मासेमारीसाठी गेलेल्या पालघरच्या माणसाची पाकिस्तानने केली हत्या : India to approach Pakistan after killing of Indian fisherman मासेमारीसाठी समुद्रात खोलवर गेलेल्या एका भारतीय बोटीतील कोळी बांधवांना (fishermen) लक्ष्य करुन पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (पीएमएसए) गोळीबार केला. या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील श्रीधर चमारे (३२) यांचा मृत्यू झाला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. NCB SIT ने आर्यन खानसह ७ जणांना बजावले समन्स : NCB SIT summoned Aryan Khan for questioning in connection with drugs-on-cruise-case एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट, अचित कुमार या तिघांसह एकूण सात जणांना समन्स बजावले आहे. चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर, शासनाचा मात्र अद्यापपर्यंत निर्णय नाही , हजारो भाविक दाखल : Kartiki Ekadashi 2021 district collector announces the rules सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर केली. पण राज्य शासनाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेबाबत कोणतीही घोषणा अद्यापपर्यंत केली नाही. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. दिवसभरात राज्यात ८९२ रुग्ण, १६ मृत्यू, १०६३ कोरोनामुक्त : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 7 November 2021 महाराष्ट्रात दिवसभरात ८९२ कोरोना रुग्ण आणि १६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १०६३ जण कोरोनामुक्त झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी : Anil Deshmukh in ED custody till November 12 मुंबईच्या उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ईडी कोठडी दिली. यामुळे अनिल देशमुख १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असतील. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी