दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०९ नोव्हेंबर २०२१: मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब ते ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2021 | 20:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 09 November 2021 ।Headlines of the 09 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 09 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०९ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.
  • ४५ आगरांमधील १६ विभागातील ३७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली
  • एसआयटीला अद्याप तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळला नाही.

Whole Day Top 5 News 09 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 09 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बची आहे. आजची दुसरी बातमी देवेंद्र फडवीसांनी मलिकांवर केलेल्या आरोपांची आहे. आजची तिसरी बातमी रोहित शर्मा टी२० क्रिकेटचा कर्णधार बनणार असल्याची आहे. आजची चौथी बातमी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाल्याची आहे. आजची पाचवी बातमी संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची आहे.  

  1. Nawab malik vs Devendra Fadanvis:  फडणवीसांबाबत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक : अंडरवर्ल्ड संबंधित लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने  विकत घेतल्याचा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. पण उद्या सकाळी दहा वाजता फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉन याचे कसे संबंध होते याचा हायड्रोजन बॉम्ब मी फोडणार असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Devendra Fadnavis Press Conference : फडणवीसांनी फोडला बॉम्ब: अंडरवर्ल्डशी नवाब मलिक कुटुंबियांचे संबंध, 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून घेतली जमीन : विरोधीपक्ष नेते (Leader of Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference ) सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी (underworld) संबंध आहेत. त्यांनी कवडीमोल भावात अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मुंबईत 3 एकर जमीन घेतली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Rohit Sharma: रोहित शर्मा बनणार टी-२० कॅप्टन, विराट करणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये आराम :  पुढील एक ते दोन दिवसांत न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची(team india) घोषणा केली जाणार आहे. याआधीच विविध अटकळी बांधल्या जात आहेत. असं म्हटलं जातयं की भारतीय क्रिकेटमध्ये खूप बदल दिसू शकतात. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला(rohit sharma) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा कर्णधार(indian captain) केला जाऊ शकतो. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Aryan Khan Drugs Case : ड्रग्स प्रकरणात कशी होत-होती वसुली, SITच्या चौकशीत धक्कादायक खुलासा, काय होती गोसावी अन् समीरची भूमिका :  ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यनचं (Aryan Khan) नाव आल्यानं रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) (एनसीबी) नावाने काही जणांनी वसुली केल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. ST Worker Suspended । एसटी कामगारांविरोधात मोठी कारवाई, तब्बल एवढे कर्मचारी करण्यात आले निलंबित : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्या घेवून आंदोलन करत आहे. एसटी कामगार यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील बससेवा बंद आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणारे अनेक प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने  हे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी