दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० जून २०२१: मुंबईत पुढील पाच मुसळधार पाऊस ते १८ राज्यांमध्ये सोन सूदचे ऑक्सिजन

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2021 | 20:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 10 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 10 June 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० जून २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बुधवारी एका दिवसात 6148 मृत्यू नोंदविण्यात आले.
  • मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार होण्याची शक्यता
  • महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दिले लसचे दोन्ही डोस

मुंबई : Headlines of the 10 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याची आहे. आजची दुसरी बातमी महाराष्ट्रातील लसीकरणाची आहे. आजची तिसरी बातमी रिलायन्स कंपनीने लसींसाठी नवीन सर्व्हिस सुरू केल्याची आहे. आजची चौथी बातमी टायगर श्रॉफच्या हिरोपंती २ या सिनेमाविषयीची आहे. आजची पाचवी बातमी सोनू सूदची देशातील अनेक राज्यात ऑक्सिजन प्रकल्प सुरू करणार असल्याची आहे.  

  1. मुंबईकरांनो सावधान ! पुढील पाच दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा : मान्सून  (Monsoon) आल्याच्या पहिल्या दिवशी पावसाने कहर केला. मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात काल दिवसभर पावसाचं थैमान घातले. अनेक सकल भागात पाणी साचल्याचे आपण पाहिलं,  दरम्यान पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Weather Forecast) अंदाज वर्तवण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दिले लसचे दोन्ही डोस : महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. जनगणनेच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या ११.४२ कोटी होती. या लोकसंख्येतील वाढ विचारात घेतली तरी राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. कोरोना लसीसाठी  Reliance Jio करणार तुमची मदत, सुरू केली खास सर्व्हिस : COVID 19पासून बचावासाठी कोरोनाची लस(corona vaccine) घेणे किती गरजेचे आहे हे आपण सगळेच जाणतो. आता टेलिकॉम कंपनी  Reliance Jioने खास सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या माध्यमातून युजर व्हॉट्सअॅप(whatsapp) फोनवरील रिचार्ज करण्याशिवाय कोरोना लसीच्या(corona vaccine) उपलब्धतेबाबत माहिती मिळवू शकतात. जिओने खास सर्व्हिस व्हॉट्सअॅप चॅटबोटच्या माध्यमातून सुरू केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. रशियात 'हिरोपंती २'चे शूटिंग : हमद खान दिग्दर्शित साजिद नाडियाडवाला यांच्या 'हिरोपंती २' सिनेमाच्या मुंबईतील शूटिंगचे शेड्युल्ड पूर्ण झाले. सिनेमाच्या शूटिंगचे पुढील शेड्युल्ड रशियात पार पडेल. तिथे सिनेमातील अनेक अॅक्शन दृश्य चित्रीत होणार आहेत. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह 'हिरोपंती २' सिनेमाची टीम शूटिंगसाठी रशियाला जाणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सोनू सूद देशातील १८ राज्यांमध्ये सुरू करणार ऑक्सिजन प्रकल्प, किती खर्च करणार?: बॉलीवूडच्या अभिनेता (Bollywood Actor) सोदू सूद (Sonu Sood) मागील वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची (Medical Oxygen) मोठी कमतरता भासली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोनू सूदने आता १८ राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीसाठीचे प्रकल्प (Oxygen Plant) सुरू करण्याची घोषणा केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी