दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० नोव्हेंबर २०२१: ग्रीन एनर्जी असणार भारताचे भविष्य ते विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 10, 2021 | 20:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 10 November 2021 । Headlines of the 10 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 10 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात होता - नवाब मलिक
  • थंडीच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देत घेतला निर्णय
  • लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि युनायटेड स्टेट्सच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना सचिन तेंडुलकरने मागे टाकले आहे.

Whole Day Top 5 News 10 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 10 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी टाइम्स नाउच्या समिटची आहे. आजची दुसरी बातमी नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची आहे. आजची तिसरी बातमी डझनभर रेल्वे गाड्या रद्द झाल्याची आहे. आजची चौथी बातमी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं विराट कोहलीच्या टी20 करिअरविषयी भविष्यवाणी केल्याची आहे. आजची पाचवी बातमी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागासांठी निवडणूक जाहीर झाल्याची आहे. 

  1. Times Now Summit 2021: ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य - गडकरी : ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. देशातील वाहने ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी यांच्याद्वारे चालवण्याची योजना असल्याचे गडकरी म्हणाले. ते टाइम्स नाउ समिट २०२१ (Times Now Summit 2021) या कार्यक्रमात बोलत होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Nawab Malik vs Devendra Fadanvis : देवेंद्रजी तुमचे अजून काही काळे कारनामे आहेत ते काही दिवसात समोर आणणार... : १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis )यांनी मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आज पत्रकार परिषदेत करत 'हायड्रोजन बॉम्ब' (Hydrogen Bomb) टाकला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Indian Railways भारतीय रेल्वे फेब्रुवारी २०२२ पर्यंत रद्द करणार 'या' गाड्या : भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत धावणार असलेल्या सहा जोडी गाड्या रद्द करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने थंडीच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात दरम्यान सहा जोडी गाड्या रद्द करणार असल्याचे जाहीर केले. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. पश्चिम रेल्वेने १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वांद्रे, अहमदाबाद, वलसाड, उज्जैन येथून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या बारा गाड्या रद्द केल्या आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. virat kohli: विराट कोहली घेणार टी-२०मधून निवृत्ती, आयपीएलमध्ये खेळत राहणार - माजी क्रिकेटर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने(team india captain virat kohli) आयसीसी टी-२० वर्ल्डकप(icc t-20 world cup) सुरू होण्याआधीच या फॉरमॅटमधून कॅप्टन्सी सोडण्याचे जाहीर केले होते. मंगळवारी त्याच्या जागी बीसीसीआयने(bcci) रोहित शर्माला(rohit sharma) टी-२०संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे ही जबाबदारी सांभाळणार आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटक मुश्ताक अहमदने विराटच्या टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती बद्दल म्हटले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत द्विवार्षिक निवडणूक-२०२१ कार्यक्रम जाहीर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी