दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ नोव्हेंबर २०२१: राष्ट्रवादी काँग्रेस ईडीला जाब विचारणार ते पाच वर्षात रेल्वेचा कायापालट

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 11, 2021 | 20:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 11 November 2021 । Headlines of the 11 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 11 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट करणार, मे २०२२ मध्ये 5G चा लिलाव होणार - अश्विनी वैष्णव
  • सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ पासून जगातील १५२ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल
  • द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त

Whole Day Top 5 News 11 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 11 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी राष्ट्रवादी काँग्रेस ईडीला कारवाईच्या कामांचा जाब विचारणार असल्याची आहे. आजची दुसरी बातमी गुजरातमध्ये ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची आहे. आजची तिसरी बातमी तमिळनाडूमधील अनेक भागत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याची आहे. आजची चौथी बातमी भारताने चीन, हाँगकाँग, मकाऊला ई-व्हिसा नाकारल्याची आहे. आजची पाचवी बातमी टाइम्स नाउच्या समिटमधील असून भारतीय रेल्वेचा कायापलट वर्षात होणार असल्याचे सुतोवाच अश्विनी वैष्णव यांनी केल्याची आहे.  

  1. NCP Agitation Against ED: भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचे काय झालं; राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयावर धडकणार : भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Gujarat Drugs Case : तब्बल 350 कोटींच्या ड्रग्जसह महाराष्ट्रातल्या भाजी विक्रेत्याला गुजरातमध्ये अटक; पाकिस्तान कनेक्शनही उघड : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ड्रग्जवरुन (Drugs) रणकंद सुरू आहे. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात येत आहे. अशात गुजरातमधील (Gujarat) द्वारकाच्या (Dwarka) खंभालिया परिसरात तब्बल साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Chennai Rain Weather Updates: तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागांमध्ये रेड अलर्ट : भारतीय हवामान खात्याने  (IMD)आजही उत्तर चेन्नई(North chennai) तिरूवल्लूर, चेंगलपेट, विल्लुपुरम, कांचीपुरम, रानीपेट आणि कुड्डालोर जिल्ह्यांसहित तामिळनाडूच्या(tamilnadu) काही भागांमध्ये मुसळधार पावसाची(heavy rain) शक्यता वर्तवत रेड अलर्ट(red alert) जारी केला आहे. आपल्या नव्या बुलेटिनमद्ये भारतीय हवामान विभागाने(imd) म्हटले की मोसमी वारे ४ किमी प्रति तासाच्या वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिमच्या दिशेने वाढत होता. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. e-visa भारताने चीन, हाँगकाँग, मकाऊला ई-व्हिसा नाकारला : वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या चीनला वठणीवर आणण्यासाठी भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ पासून जगातील १५२ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. या देशांमधून चीन, हाँगकाँग, मकाऊ यांना वगळण्यात आले आहे.  सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Times Now Summit 2021 : पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट करणार, मे २०२२ मध्ये 5G चा लिलाव होणार - अश्विनी वैष्णव : भारताचे रेल्वेमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी टाइम्स नाउ समिट 2021 च्या निमित्ताने टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी बातचीत केली. याप्रसंगी बोलताना पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव एप्रिल-मे २०२२ मध्ये होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी