दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ नोव्हेंबर २०२१: जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्याचा खात्मा ते पहिल्या कसोटीत रहाणेकडे कर्णधारपद

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 12, 2021 | 20:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 12 November 2021 Headlines of the 12 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 12 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये...
  • स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते...
  • चीनचा कोणताही बेकायदेशीर कब्जा स्वीकारला जाणार नाही, असेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Whole Day Top 5 News 12 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 12 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमकीचा आहे. आजची दुसरी बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपच्या प्रवेश केल्याने जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केल्याची आहे.  आजची तिसरी बातमी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्याची आहे. आजची चौथी बातमी चीनच्या बेकायदेशीर कब्जावर भारताने तीव्र विरोध केल्याची आहे. आजची पाचवी बातमी पहिल्या कसोटीमध्ये अजिंक्य राहणे संघाचं नेतृत्व करणार असल्याची आहे. 

  1. Jammu Kashmir Encounter: कुलगाममध्ये दुसऱ्या दिवशीही चकमक सुरू; चौवीस तासात 3 दहशतवाद्यांचा खात्मा : जम्मू कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गेल्या 24 तासात चालू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी (security force) तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा (Killed) केला आहे. कुलगाममध्ये दोन तर श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. कुलगाम (Kulgam) मध्ये चालू असलेल्या चकमकीचा (Encounter) आज दुसरा दिवस आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. ST Worker Strike : एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पहात नाही - जयंत पाटील : एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत... दंगा करत आहेत... अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. kirit somaiya On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री हिंदुत्व सोडून हिरवेधारी झाले असले तरी त्यांची प्रकृती लवकर बरी होवो :  किरीट सोमय्या  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात काम नव्हे तर खाली मान करून पैसे मोजत होते, स्वतःच्या बायकोचे  19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते असा निशाना किरीट सोमय्या यांनी साधला आहे... सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. India China news: 'चीनचा बेकायदेशीर कब्जा मान्य नाही, अन करणारही नाही', पेंटागॉनच्या अहवालानंतर 'ड्रॅगन'ला भारताचे सडेतोड उत्तर : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर  (LAC)भारत-चीन (India-China)तणावाच्या दरम्यान, अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनच्या अहवालात चीन सीमेवर सातत्याने धोरणात्मक कारवाया करत असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या विवादित भागात चीनने सामान्य लोकांसाठी सुमारे 100 घरे असलेले एक गाव वसविल्याचेही यात म्हटले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Ind Vs NZ Test: रोहित, पंत आणि बुमराहला आराम, पहिल्या कसोटी रहाणे करणार नेतृत्व : उप कर्णधार अजिंक्य रहाणे(vice captain ajinkya rahane) कानपूरमध्ये(kanpur) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत(test match) भारतीय संघाचे(indian team) नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली(virat kohli) मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत जबाबदारी सांभळण्यासाठी परतणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी