दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ नोव्हेंबर २०२१: त्रिपुरातील 'त्या' बातम्या खोट्या ते रेल्वेचा मोठा निर्णय

Whole Day Top 5 News 13 November 2021 दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 13 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ नोव्हेंबर २०२१: त्रिपुरातील 'त्या' बातम्या खोट्या ते रेल्वेचा मोठा निर्णय
  • त्रिपुरातील मशिदीचे नुकसान झाल्याच्या बातम्या खोट्या
  • मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला, कर्नलसह ७ जणांचा मृत्यू

Whole Day Top 5 News 13 November 2021 । नवी दिल्ली: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी त्रिपुरातील मशिदीचे नुकसान झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याची. आजची दुसरी बातमी मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची. आजची तिसरी बातमी गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची. आजची चौथी बातमी नितेश राणेंनी केलेल्या आरोपाची. आजची पाचवी बातमी रेल्वेच्या मोठ्या निर्णयाची.

  1. त्रिपुरातील मशिदीचे नुकसान झाल्याच्या बातम्या खोट्या : News about damage and vandalization of a mosque in Gomati district of Tripura is fake त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील काकराबन भागातील एका मशिदीचे नुकसान आणि मोडतोड झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्या खोट्या  असून यात तथ्यांचे पूर्णपणे  चुकीचे वर्णन केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला, कर्नलसह ७ जणांचा मृत्यू : Assam Rifles CO, his family members, 4 jawans killed in terror ambush in Manipur सिनघाट सब-डिव्हिजनमध्ये '४६ आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांना  वीरमरण आले. कर्नल त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त आणखी ४ जवानांना वीरमरण आले. कमांडिगं ऑफिसरची पत्नी आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार : 26 Naxalites killed in Gadchiroli महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी सी ६० युनिटच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई २६ नक्षलवादी ठार झाले. चकमकीत तीन पोलीस जखमी झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. महाराष्ट्रातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत - नितेश राणे : Raza Academy responsible for violence in Maharashtra says Nitesh Rane त्रिपुरातील कथित घटनेचे निमित्त पुढे करुन महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसा करण्यात आली. महाराष्ट्रातील या हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. स्पेशल ट्रेन आणि स्पेशल ट्रेनचे दर रद्द होणार : Railways to discontinue special trains, revert to certain pre-Covid-19 fares रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विशेष हा दर्जा रद्द करण्याचा तसेच कोरोना काळातील दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी