दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०२१: राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर ते टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात शार्दुल ठाकूरचा समावेश

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 13, 2021 | 21:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 13 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.  

Whole Day Top 5 News 13 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
  • स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे.
  • सातारा शहरात टू-व्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे.

नवी दिल्ली : Headlines of the 13 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.  आजची पहिली बातमी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केल्याची आहे. आजची दुसरी बातमी राज्यातील महाविद्यालयाविषयीची आहे. आजची तिसरी बातमी राजनाथ सिंह यांनी सावकरांविषयी केलेल्या वक्तव्याविषयीची आहे. आजची चौथी बातमी शिवेंद्रसिंहराजेंचा खासदार उदयनराजेंवर केलेल्या टीकेची आहे. आजची पाचवी बातमी टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आल्याची आहे. 

  1. मोठी बातमी ! अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत राज्य सरकारकडून जाहीर :  राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीनंतरही राज्य सरकारकडून मदत घोषित करण्यात विलंब होत असल्याचा आरोप करत सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता अखेर ठाकरे सरकारने (Thackeray Government) मदतीची घोषणा केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. College News । राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार - उदय सामंत : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. महात्मा गांधींमुळे सावरकरांनी दया याचिका दाखल केली : राजनाथ सिंह :  सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले. वारंवार म्हटलं गेलं की, त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर अनेक दया याचिका दाखल केल्या. मात्र हिंदुत्वाचे आयकॉन वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैदेत असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Satara Municipal Election । टू व्हिलरवरून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा खासदार उदयनराजेंवर हल्लाबोल [video] : सातारा शहरात टू-व्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे. त्यांनी टु-व्हीलर जशी व्यवस्थित चालवली तसेच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती, आज जी विकास कामे दाखवली जात आहेत ती फक्त नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांच्यावर केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. T-20world cup:टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये हा बदल, अक्षरच्या जागी या क्रिकेटरला संधी : टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा बदल केला आहे. संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला मुख्य टी-२० संघाचा भाग बनवण्यात आला आहे. तर आधी सामील करण्यात आलेल्या अक्षर पटेलला १५ सदस्यीय संघातून बाहेर काढून स्टँड बाय खेळाडूंना या यादीत सामील केले आहे. संघात ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कायम आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी