दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ नोव्हेंबर २०२१: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा बंद ते जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 14, 2021 | 20:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 14 November 2021 । Headlines of the 14 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 14 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ
  • अमरावती येथे 5 हुन अधिक जमाव घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • सीआरपीएफच्या ३० कंपन्या आणि बीएसएफच्या २५ कंपन्या जम्मू काश्मीरमध्ये नियुक्त

Whole Day Top 5 News 14 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 14 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी अमरावतीतील हिंसाचाराविषयीची आहे. आजची दुसरी बातमी पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी कोरोना झाल्याची आहे. आजची तिसरी बातमी नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याची आहे. आजची चौथी बातमी अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रानौतला पाठिंबा दिल्याची आहे. आजची पाचवी बातमी जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती करण्यात आल्याची आहे. 

  1. Amravati Violence: अमरावतीमध्ये संचराबंदी लागू, तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; त्रिपुरावरुन पसरली अफवा : त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांमध्ये मुस्लीम संघटनेकडून (Muslim organization) निषेध मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची (Amravati Bandh) हाक देण्यात आली होती, पण या बंदला हिंसक (Violence) वळण लागलं. हिंसक वळण लागल्यानंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा (internet service ) निलंबित करण्यात आली असल्याची माहिती आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. महाराष्ट्र: पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना : कोरोना संकटाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस अकादमीला बसला आहे. अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या २२ पोलिसांना कोरोना झाला आहे. फक्त दोन दिवसांत अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना झाल्याचे आढळले. सर्व कोरोनाबाधीत प्रशिक्षणार्थी पोलिसांना नाशिक महानगरपालिका संचालित बिटको रुग्णालयात दाखल केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. Gadchiroli Naxal: चार तासाच्या चकमकीत 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री ठार; कोण आहे हा तेलतुंबडे? : महाराष्ट्र (Maharashtra)-छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेलगत कोटगुल (Kotgul)-ग्यारापत्ती (Gyarapatti) जंगल (forest) परिसरात ‘सी-60’ पोलिसांशी (‘C-60’ police) झालेल्या चकमकीत (Encounter) शनिवारी 26 नक्षलवादी (Naxalites) ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं; कंगना जे म्हणाली ते खरंय, विक्रम गोखलेंकडून समर्थन :  कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते (Veteran actor) विक्रम गोखलेही (Vikram Gokhale) वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण कंगनाच्या वादग्रस्त (Controversial) विधानावर त्यांनी समर्थन दिले आहे. दोन-तीन दिवसापूर्वी अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) भारताच्या स्वातंत्र्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती : दहशतवाद्यांनी सामान्यांच्या हत्या करण्याचे सत्र सुरू केले आहे. हे प्रकार थांबावेत आणि सर्व दहशतवाद्यांचा बीमोड करणे सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. विस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी