दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ सप्टेंबर २०२१: अमरावतीमधील दुर्घटना ते पेगॅसस प्रकरणी प्रतिज्ञापत्रास नकार

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 14, 2021 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 14 September 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 14 September 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ सप्टेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा विशेष पुढाकार
  • सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली.
  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ७ सप्टेंबरला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदत दिली होती.

नवी दिल्ली :  Headlines of the 14 September 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी अमरावतीमधील दुर्घटनेची असून येथे नदीत बोट उलटून 11 जण पाण्यात बुडल्याची घटना घडल्याची आहे. आजची दुसरी बातमी मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात झालेल्या गोंधळाची आहे. आजची तिसरी बातमी महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केल्याची आहे. आजची चौथी बातमी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणीची आहे. आजची पाचवी बातमी पेगॅसस प्रकरणाची आहे. 

  1. वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; चौघांचे मृतदेह हाती :  जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या साकिनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर निघाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक अज्ञात मर्सिडीज कार अचानक घुसली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Mumbai police : साकीनाका घटनेनंतर महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा विशेष पुढाकार, निर्भया पथकाची स्थापना : साकीनाका बलात्कार प्रकरणात पोलिसांनी गुप्ततेचा दावा केला आणि सांगितले की आर्थिक वाद हे घटनेमागील कारण आहे.  त्यामुळे मुंबई पोलिसांवर टिका होऊ लागली.पण त्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पंतप्रधानांकडून पायाभरणी; म्हणाले, 21 वे शतकात भारत चुका सुधारतोय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची आठवण केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पेगॅसस : केंद्राने बेकायदा वापर केला नाही ना मग प्रतिज्ञापत्र द्या; पण सरकारचा सर्वोच्च न्यायालयात नकार : पेगॅसस स्पायवेअर’द्वारे (Pegasus Spyware) केंद्राने (Central Government) लोकांवर ठेवलेल्या पाळत प्रकरणी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आता अंतिम निर्णय देणार आहे. नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी इस्रायलच्या ‘पेगॅसस स्पायवेअर’चा वापर केल्याच्या आरोपाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार दिला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी