दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ नोव्हेंबर २०२१: अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ते अमरावती हिंसाचार प्रकरणी ९० जणांना अटक

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 15, 2021 | 22:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Whole Day Top 5 News 15 November 2021 । Headlines of the 15 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 15 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (erandol)येथे ही कारवाई करण्यात आली.
  • इंधन आणि वीज यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे देशातील महागाई वाढली
  • आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

Whole Day Top 5 News 15 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 15 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी मिळल्याची आहे. आजची दुसरी बातमी नांदेड आणि जळगावमध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईची आहे. आजची तिसरी बातमी देशातील वाढत्या माहागाईविषयीची आहे. आजची चौथी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन झाल्याची आहे. आजची पाचवी बातमी बातमी अमरावती हिंसाचाराप्रकरणी भाजपच्या नेत्यांसह ९० जणांना अटक झाल्याची आहे. 

  1. अनिल देशमुख यांच्या अडचणी संपेना; माजी गृहमंत्र्यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. तसेच, सचिन वाझेला (Sachin Waze) देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. NCB Raid in Nanded and Jalgaon : एनसीबीच्या पथकाने नांदेडमध्ये पकडला 1.1 टन गांजा, एरंडोलमधून केला १५०० किलो गांजा जप्त :  गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होती. पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवली जात आहे. 2 जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून 1.1 टन गांजा पकडला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 4 कोटी आहे. गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होती. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. October WPI Inflation | घाऊक महागाईचा दणका, ऑक्टोबरमध्ये वाढ होत १२.५४ टक्के :  ऑक्टोबर महिन्यात देशातील महागाईत (Inflation) वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर (Wholesale Price Index – WPI) वाढून १२.५४ टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई १०.६६ टक्के होती. देशातील इंधनाचे वाढलेले दर (Fuel prices) आणि वीजेचे वाढलेले दर (Electricity rate) याचा परिणाम होत घाऊक महागाईमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याचबरोबर महागाईत वाढ होण्यासाठी उत्पादित झालेल्या वस्तूंच्या किंमतीमध्ये झालेली वाढदेखील कारणीभूत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Shivshahir Babasaheb Purandare passed away: महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार :  मराठी साहित्यिक(Marathi litterateur), नाटककार, इतिहासकार (Historian) म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे आज पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Amravati Violence: पोलिसांची धरपकड सुरू; आतापर्यंत ९० जणांना बेड्या, भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर गावंडेही अटकेत : अमरावती (Amravati ) बंदला हिंसक (Violence) वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह (Anil Bonde) महापौर चेतन गावंडे (Mayor Chetan Gawande) आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय (BJP Leader Tushar Bhartiya) यांचाही समावेश असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी