दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ एप्रिल २०२१: रेमडेसिविर स्वस्त ते रेल्वेची मास्क सक्ती

Headlines of the 17 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

whole day top 5 news 17 April 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ एप्रिल २०२१: रेमडेसिविर स्वस्त ते रेल्वेची मास्क सक्ती
  • भारताचा चेक बाऊन्स संदर्भातील कायदा बदलणार
  • आरटीजीएस ही सुविधा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. यामुळे अँटी व्हायरल ड्रग रेमडेसिविरच्या किंमतीत घट झाली; ही आजच्या दिवसातील पहिली महत्त्वाची बातमी. रेल्वेमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता ५०० रुपयांचा दंड होणार; ही आजच्या दिवसातील दुसरी महत्त्वाची बातमी. भारताचा चेक बाऊन्स संदर्भातील कायदा बदलणार; ही आजच्या दिवसातील तिसरी महत्त्वाची बातमी. आरटीजीएस ही सुविधा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार आहे; ही आजच्या दिवसातील चौथी महत्त्वाची बातमी. मुंबईत वाहन फिरवण्यासाठी लागेल 'कलर कोड स्टिकर'; ही आजच्या दिवसातील पाचवी महत्त्वाची बातमी.

महाराष्ट्रात २४ तासांत ६७ हजार १२३ नवे कोरोना रुग्ण

  1. Remdesivir Injection:सरकारच्या हस्तक्षेपानंतर स्वस्त झाले रेमडेसिविर इंजेक्शन, विविध कंपन्यांच्य किंमती जाणूया : इंजेक्शनचा तुटवडा आणि मागणी लक्षात घेऊन सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन दुप्पट करण्यास परवानगी दिली आहे. तर सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषध उत्पादकांनी या इंजेक्शनच्या किंमतीत कपात केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  2. रेल्वेत मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना होणार ५०० रुपयांचा दंड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेकडून नियमांचे कसोशीने पालन केले जात आहे. रेल्वेमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनाकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  3. चेक बाऊन्स संदर्भातील कायदा बदलणार, नेमका कसा असेल कायदा, समजून घ्या : जर एका वर्षात एखाद्या व्यक्तीच्या विरोधात सिंगल ट्रॅन्झॅक्शनसंदर्भात वेगवेगळ्या चेक बाऊन्सची प्रकरणे समोर आली तर अशा प्रकरणांचे एकत्रीकरण केले पाहिजे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  4. आज रात्री १२ वाजेपासून १४ तासांसाठी पैसे ट्रान्सफर करण्याची 'ही' सुविधा बंद राहणार, कारण जाणून घ्या : आरटीजीएस ही सुविधा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार आहे. सिस्टम अद्ययावत आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी अपग्रेड करायची आहे, त्यामुळे ही सुविधा उपलब्ध राहणार नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  5. मुंबईत वाहन फिरवण्यासाठी लागेल 'कलर कोड स्टिकर' : मुंबई पोलिसांच्या नव्या नियमानुसार खासगी वाहनाच्या समोरच्या आणि मागच्या दर्शनी भागावर सहज दिसेल अशा पद्धतीने 'कलर कोड स्टिकर' लावावा लागेल. स्टिकर वाहनावर लावला असेल तरच ते खासगी वाहन रस्त्यावर आणता येईल. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी