दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जून २०२१ : प्रदीप शर्मा यांना अटक ते अजित पवारांचा मराठवाडा दौरा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 17, 2021 | 21:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 17 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 17 june 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जून २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असल्याचा संशय
  • भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत.
  • खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड परस्थितीचा आढावा घेण्याच्या कारणाने अजित पवार यांचा दौरा

मुंबई : Headlines of the 17 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी एन्कांउटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेची आहे. आजची दुसरी बातमी शिवसेनेने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीत युती राहणार असल्याचा इशारा काँग्रेसला दिल्याची आहे. आजची तिसरी बातमी डहाणूतील फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची आहे. आजची चौथी बातमी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याची आहे. तर आजची पाचवी बातमी अजित पवारांच्या मराठवाडा दौऱ्याची आहे. 

  1. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक; 112 एनकाउंटर करणारे शर्मा मानले जातात वाझेंचे गुरू :  उद्योगपती अंबानी  (Industrialist Ambani) धमकी प्रकरण (threat case) तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren murder case) राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) तपास करत आहे. या तपासादरम्यान एनआयएने एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) यांच्या घरावर छापा (raid) टाकला आहे, सकाळी सहा वाजता एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला. प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.   प्रदीप शर्मा यांची पाच तास कसून चौकशी केल्यानंतर एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. पटोलेंच्या घोषणेनंतर शिवसेना म्हणते, महाराष्ट्र हितासाठी राष्ट्रवादी- सेनेलाच एकत्र राहावे लागेल : एकीकडे काही काळी सवंगडी असलेला भाजप (BJP) पक्ष शिवसेनेवर (ShivSena)शत्रूसारखं लक्ष्य करत आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेला मित्र पक्ष काँग्रेसनेही एकाला चलो ला पसंती देऊ केली आहे. यावरुन शिवसेनेने आपल्या मूखपत्राच्या अग्रलेखातून(Editorial) एक सूचक इशारा दिला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. [video] पालघर : डहाणूतील फटाका कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील घरे स्फोटांनी हादरली : फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या विशाल फटाका कंपनीत हा प्रकार घडला आहे. या स्फोटात १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती टाइम्स नाऊ मराठीच्या हाती आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना २ दिवसांच्या जोरदार पावसाचा अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (गुरुवार, १७ जून २०२१) दिवसभर मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत होत्या. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. अजित पवारांचा मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांचा दौरा :   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार १८ जून २०२१ रोजी मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ते कोरोना संकटाची स्थिती आणि खरीप हंगामाची तयारी याचा आढावा घेणार आहेत. अजित पवार यांचा हा दौरा प्रशासकीय असला तरी या दौऱ्याला राजकीय महत्व अधिक आहे.सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी