दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०२१: राज्यातील कोरोना निर्बंध शिथील होणार ते सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत विजयी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 17, 2021 | 21:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 17 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 17 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.
  • अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे.
  • महाराष्ट्र शासन दिवाळीनंतर कोरोना प्रतिबंधक लसचा एक डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देऊ शकते

नवी दिल्ली : Headlines of the 17 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.  आजची पहिली बातमी राज्यातील कोरोना निर्बंध शिथील होण्यासंदर्भातील आहे. आजची दुसरी बातमी पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये झालेल्या दोन गटात झालेल्या हाणामारीची आहे. आजची तिसरी बातमी केरळमधील मुसळधार पावसाची आहे. आजची चौथी बातमी राज्यात मान्सूनच्या मुक्काम वाढल्याची आहे. आजची पाचवी बातमी सॅफ फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकल्याची आहे. 

  1. दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत : महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होऊ शकतात, असे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दिवाळीनंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. परिस्थिती नियंत्रणात असेल आणि कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असेल तर निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. West Bengal: पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये दुर्गा मुर्तीचं विसर्जन करुन परतणाऱ्या जमावावर बॉम्ब हल्ला : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये काही लोकांनी शनिवारी रात्री 'दुर्गा मूर्ती विसर्जन' करुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला केला. या घटनेनंतर त्या परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. केरळमध्ये पावसाचा हाहाःकार; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता : दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे आलेला पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आज 22 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात  (Arabian sea) दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाले (Low pressure area) आहे. दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा मान्सूनवर (Monsoon) परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात दोन ते तीन दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारताने आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली, छेत्रीने मेसीशी केली बरोबरी : भारतीय फुटबॉल टीमने नेपाळचा ३-० असा पराभव केला आणि आठव्यांदा सॅफ (SAFF – South Asian Football Federation) फुटबॉल स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक गोल करुन भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली.  सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी