दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ नोव्हेंबर २०२१: आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी ते पाकिस्तानचा कायदा

Whole Day Top 5 News 18 November 2021 दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 18 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ नोव्हेंबर २०२१: आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी ते पाकिस्तानचा कायदा
  • एसटी कर्मचारी उपाशी, आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी - भातखळकर
  • परमबीर आपण आहात कुठे, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Whole Day Top 5 News 18 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 18 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी आदित्य ठाकरेंच्या स्कॉटलंड वारीची. आजची दुसरी बातमी परमबीर सिंह यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेची. आजची तिसरी बातमी पेटीएमचा शेअर गडगडूनही चिनी कंपन्यांना झालेल्या फायद्याची. आजची चौथी बातमी विमान उद्योगातील टाटा विरुद्ध झुनझुनवाला स्पर्धेची. आजची पाचवी बातमी पाकिस्तानमधील कठोर कायद्याची.

भारताच्या आरोग्य क्षेत्रात २०१४ नंतर झाली १२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

  1. एसटी कर्मचारी उपाशी, आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी - भातखळकर : Aditya Thackeray's Scotland Trip “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. परमबीर आपण आहात कुठे, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल : 'No hearing until we know where you are': SC on Param Bir Singh's plea परमबीर यांनी स्वतःच्या ठावठिकाण्याची माहिती जाहीर न करता सर्वोच्च न्यायालयात याचिका करुन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी करू, पण परमबीर आपण आहात कुठे; असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पेटीएमचा शेअर गडगडला मात्र चीनी अॅंट फायनान्शियल, अलिबाबा यांची १ अब्ज डॉलरची कमाई : Paytm IPO | अॅंट फायनान्शियल (Ant Financial)आणि अलिबाबा (Alibaba)या चीनी कंपन्यांची पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक होती. पेटीएमची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर या चीनी कंपन्यांनी पेटीएममधील (Paytm)आपला काही हिस्सा विकला आहे. त्यातून या चीनी कंपन्यांनी जवळपास १ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. दोन्ही चीनी कंपन्यांनी पेटीएममधील आपला सरासरी ६ टक्के हिस्सा विकला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. टाटांना राकेश झुनझुनवाला देणार टक्कर, विकत घेतली बोईंग ७२ विमाने, दोनच दिवसात १ लाख कोटींचा सौदा : Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या नव्या अकासा एअर या विमानसेवा कंपनीसाठी बोईंगच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली होती. अकासा एअर आणि बोईंग यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार अकासा एअरने ७३७ मॅक्स जेटच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. ७३७-८ आणि उच्च क्षमता असणारे ७३७-८-२०० यांचा समावेश आहे. अकासा एअर जून २०२२ पर्यत विमानसेवा सुरू करण्याची तयारी करते आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पाकिस्तानात सवय म्हणून लैंगिक शोषण करणाऱ्याला बनवले जाणार नपुंसक, संसदेचा नवा कायदा : Pakistan | पाकिस्तानच्या संसदेने (Pakistan Parliament) लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पास केले आहे. या कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषीला औषध देऊन नपुंसक (Impotent)बनवले जाणार आहे. देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी