दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ ऑक्टोबर २०२१: शेतकऱ्यांचा रेल रोको ते आयर्लंडच्या कॅम्फरचा विक्रम

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 18, 2021 | 20:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 18 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 18 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख आणि आपल्या व्यक्तव्याच्या माध्यमातून भाजप व केंद्र सरकारवर गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे
  • महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.

नवी दिल्ली : Headlines of the 18 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी शेतकऱ्यांनी केलेल्या रेल रोको आंदोलनाची आहे. आजची दुसरी बातमी आहे, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याकडे हर्बल तंबाखूच्या लागवडीची मागणी संदर्भातील आहे. आजची तिसरी बातमी सुरतमधील एका पॅकेजिंग कंपनीला लागलेल्या आगीची आहे. आजची चौथी बातमी प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेची. आजची पाचवी बातमी टी 20 विश्वचषकातील अनोख्या विक्रमाची आहे. 

  1. देशभरात शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन सुरू; सायंकाळी ४ वाजेपर्यंत अडवल्या जातील रेल्वे:  तीन कृषी कायद्यांविरोधात (Three agricultural laws) चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer Movement) संयुक्त शेतकरी मोर्चाने आज देशभरात रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. सकाळी १० वाजेापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोनल केले जाणार असून आंदोलनकर्ते ४ वाजेपर्यंत रेल्वे रुळावर बसून राहणार आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, माजी मंत्र्यांचे पत्र :  महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी खोचक मागणी करणारे पत्र माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. सुरतमधील विवा पॅकेजिंग कंपनीला लागली आग; जीव वाचविण्यासाठी कामगारांनी पाचव्या मजल्यावरुन मारल्या उड्या, पहा व्हिडिओ : गुजरातच्या सुरतमध्ये (Surat)  एका कडोडोराच्या विवा पॅकेजिंग कंपनीला ( Viva Packaging Company)  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरतच्या एसडीएम यांनी सांगितले की, आग एका पॅकेजिंग युनिटला लागली. घटनास्थळी असलेल्या साधरण १२५ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तर दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. pravin darekar on Sanjay Raut । संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरपेक्षा महाराष्ट्रातील वाढत्या अराजकेतवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर बोलावं : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख आणि आपल्या व्यक्तव्याच्या माध्यमातून भाजप व केंद्र सरकारवर गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. देशामधील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी सर्व यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर होत असल्याचा बिनबुडाचे आरोप ते करत असून पुन्हा पुन्हा ढोलकी वाजवून जनतेच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. T20 World Cup: कर्टिस कॅम्परने 4 चेंडूत 4 बळी मिळवून  रचला इतिहास, ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज : टी 20 विश्वचषक 2021 मध्ये पात्रता सामने खेळले जात आहेत. आयर्लंड आणि नेदरलँड सोमवारी भिडले, ज्यात 22 वर्षीय कर्टिस केम्फरने सर्वांना आश्चर्यचकित केले. आयर्लंडच्या कॅम्फरने सलग चार चेंडूंमध्ये चार विकेट घेत इतिहास रचला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी