दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ एप्रिल २०२१: कोरोना रुग्णांची वाढ ते राज्याला मिळणार सर्वाधिक ऑक्सिजन

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 19 April 2021 : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

whole day top 5 news 19 april  2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ एप्रिल २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के
  • मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, २० वर्षे विरोधी पक्षात राजकारण केले, जनतेसाठी ३६ केसेस अंगावर घेतल्या - फडणवीस
  • वयाच्या ७८ व्या वर्षी सुमित्रा भावे यांनी घेतला जगाचा निरोप

नवी दिल्ली : Headlines of the 19 April 2021 : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.  आजची पहिली बातमी कोरोना रुग्ण संख्या वाढीची आहे. दुसरी बातमी आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांच्या निधनाची. आजची आपली तिसरी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आजची चौथी बातमी आहे, मुंबईतील एका रेल्वे अपघाताची. तर आजची पाचवी बातमी आहे, महाराष्ट्राला सर्वाधिक  मेडिकल ऑक्सिजन दिले जाणार आहे. 

  1. चिंताजनक !  २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या पार, १,६१९ जणांचा मृत्यू :  कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत आहे. मागील चार दिवसापासून  २ लाखपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. यासह मृत पावणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे ( यांचे निधन झाले.सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 
  3.  ३६ केसेस अंगावर, कारवाईच्या इशाऱ्यांना मी भीक नाही घालत, फडणवीसांचे वळसे पाटलांना प्रत्युत्तर :  ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शनिवारी रात्री मुंबई येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी सरकारी कामात हस्तक्षेप झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. VIDEO: ७ सेकंदाचा हा अंगावर काटा आणणारा मुंबईतील रेल्वेचा व्हिडिओ : असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी. असेच काहीसे मुंबईच्या वांगणी रेल्वे स्टेशनवरील एका छोट्या मुलासोबत घडले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक मेडिकल ऑक्सिजन; नॉन स्टॉप 'Oxygen Express' ने होईल वाहतूक :  राज्यात कोरोना संकट वाढत असताना केंद्र सरकार  मदत करत नसल्याचा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालय  कामाला लागले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी