दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ नोव्हेंबर २०२१: कृषी कायदे रद्द ते भारत जिंकला

Whole Day Top 5 News 19 November 2021 दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 19 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ नोव्हेंबर २०२१: कृषी कायदे रद्द ते भारत जिंकला
  • महाराष्ट्रात ११,७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्र: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, संचारबंदी कायम

Whole Day Top 5 News 19 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 19 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी कृषी कायद्यांची. आजची दुसरी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची. आजची तिसरी बातमी अमरावतीमध्ये सहा दिवसांनी इंटरनेट पूर्ववत झाल्याची. आजची चौथी बातमी अफगाणिस्तानची. आजची पाचवी बातमी भारताच्या क्रिकेटमधील विजयाची.

  1. तीन कृषी कायदे केंद्र सरकारकडून रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात ११,७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 November 2021 महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २८ हजार ७४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७२ हजार ६८१ जण बरे झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. महाराष्ट्र: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, संचारबंदी कायम : Internet services restored in Amravati महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात बंद केलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य शासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली होती. अमरावतीच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी अद्याप आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. तालिबानला धक्का, अफगाणिस्तानमध्ये 'आयसिस-के'चा धुमाकूळ : UN envoy says islamic state now present in all afghanistan provinces तालिबानच्या हातून अफगाणिस्तान निसटत आहे. अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये कमी-जास्त प्रमाणात 'आयसिस-के'चे (Islamic State – Khorasan) दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारताने मारली बाजी, मालिका २-० ने जिंकली : India won by 7 wkts against New Zealand in 2nd T20 and won series भारताने न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. सलग दुसऱ्या विजयामुळे भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज (तीन सामन्यांची मालिका) २-० अशी जिंकली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी