दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ ऑक्टोबर २०२१: लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान ते म्हाडा काढणार 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 19, 2021 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 19 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 19 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जानेवारी 2020मध्ये म्हाडाच्यावतीने तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती.
  • नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी
  • जास्तीत जास्त महिलांनी राजकरणात यावे, अशी इच्छा प्रियंका गांधींनी यावेळी बोलून दाखवली.

नवी दिल्ली : Headlines of the 19 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी राजौरी सेक्टरमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार केल्याची आहे. आजची दुसरी बातमी काँग्रेस पक्ष युपी निवडणुकीत महिलांना ४० टक्के तिकीट देणार असल्याची आहे. आजची तिसरी बातमी उत्तर महाराष्ट्रात करण्यात आलेल्या फटाके बंदीची आहे. आजची चौथी बातमी मुंबईतील पालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ मिळणार असल्याची आहे. आजची पाचवी बातमी म्हाडाच्या लॉटरीची आहे.

  1. Jammu & Kashmir । भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान :  भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. UP Assembly Elections 2022: प्रियंका गांधींनी महिलांना दिला आवाज; काँग्रेस 40 टक्के महिलांना देणार तिकीट : उत्तर प्रदेशातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस जोरात तयारीला लागली आहे. या निवडणूक मोहिमेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी सक्रीय झाल्या असून त्यांनी युपीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता एक मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महिलांना 40 टक्के तिकिटे दिली जातील. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. फटाके न फोडताच साजरी करा दिवाळी; उत्तर महाराष्ट्रात फटाके फोडण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण? : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. कोरोनामुळे ठप्प पडलेली बाजारपेठ पु्न्हा खुली झाली आहे. फटाक्याची दुकाने जागोजागी लागतील. परंतु विभागीय आयुक्तांनी केलेल्या फटाक्याची बंदीमुळे सामान्यांसह दुकानादाराचींही दिवाळी विना आवाज करणारी असणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. मराठीतून शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा वाढणार पैसा; पालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ! :  मराठी भाषेतून शिक्षण पूर्ण करण्याला इतकं महत्त्व नाही असं नेहमी म्हटलं जातं. नोकरी मिळवायची किंवा पगारात वाढ हवी तर इंग्रजी भाषेतून पदवी- पदवीत्तुर शिक्षण घेतलं पाहिजे, अशी धारणा प्रत्येकाची झाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. घराचं स्वप्न होणार पूर्ण; दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी : या दिवाळीत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण  दिवाळीच्या  मुहूर्तावर  3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने (Mhada ) काढण्यात येत आहे. म्हाडाच्या (Mhada) वतीने ही घरांची लॉटरी काढण्यात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. एका वर्षांत घरांच्या लॉटरीची  हॅटट्रिक करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी