दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २ मे २०२१: नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव ते एसबीआयच्या गृहकर्जाचे व्याजदर

लोकल ते ग्लोबल
Updated May 02, 2021 | 20:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 2 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 2 May 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २ मे २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • परराष्ट्र मंत्रालय झोपलंय का? यावर परराष्ट्रमंत्र्यांनी दिले उत्तर
  • एक्झिट पोलचा अंदाज ठरला खरा
  • कोरोना काळात अभिनेता सोनू सूदची लोकांना मदत

मुंबई : Headlines of the 2 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी राजकरणातील दंगलची आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. आजची दुसरी बातमी राज्यातील पंढरपूर येथील पोटनिवडणुकीच्या निकालाची आहे. आजची तिसरी बातमी परराष्ट्र मंत्रालयाविषी आहे. आजची आपली चौथी बातमी आहे, भारतातील सुपर हिरोची आहे, आजची आपली पाचवी बातमी आहे, स्टेट बँकेच्या गृहकर्जाविषयीची ज्यांना गृहकर्ज हवी असेल त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची बातमी आहे.

  1. प. बंगालमध्ये टीएमसीची हॅटट्रिक पण ममतांचा पराभव : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २००पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता राखली. पण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. पंढरपूर पोटनिवडणूक निकाल: जयंत पाटलांची पावसातील सभा ठरली फेल; विजयामुळे भाजपला मिळाले 'समाधान': देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा जोरात होत आहे, पण यापेक्षा त्याचबरोबर राज्यातील पंढरपूर -मंगळवेढा येथील विधान पोटनिवडणुकीच्या निकाल मोठा उत्सुकतेचा ठरला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. परराष्ट्र मंत्रालय झोपलंय का? यावर परराष्ट्रमंत्र्यांनी दिले उत्तर : कोरोना संकटाशी देश लढत आहे. या अशा वातावरणात फिलीपीन्सच्या दिल्लीतील दूतावासाशी संबंधित एक ट्वीट चर्चेत आले. यात दूतावासाताली एका व्यक्तीला ऑक्सिजन सिलेंडर हवा असल्याचा उल्लेख होता. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. ऑक्सिजनचा पुरवठा रोखणाऱ्या चीनला भिडला 'सुपर हिरो'; नंतर लगेच आलं चिनी राजदूताचं ट्विट : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन (Oxygen)ची कमतरता जाणवत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. स्टेट बॅंकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात, जाणून घ्या नवे व्याजदर : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने शनिवारी गृहकर्जावरील व्याजदरातील कपातीची घोषणा केली. आता ग्राहकांना ६.७ टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. ३० लाख रुपयांपर्यतच्या गृहकर्जासाठी ६.७ टक्के व्याजदर असणार आहे.सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी