दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जून २०२१ : सरनाईकांचा लेटरबॉम्ब ते चीनी लसींवरील संशय

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 20, 2021 | 20:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 20 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 20 June 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जून २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण.
  • आपत्ती निवारण कायद्यानुसार केवळ भूकंप, पूर आणि नैसर्गिक आपत्ती आल्यावरच मदत देण्याची तरतूद - केंद्र
  • अजित पवारांच्या उपस्थितीत ही गर्दी झाल्यामुळे अजित पवारांवर गुन्हा दाखल करा – पडळकर

मुंबई : Headlines of the 20 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बची आहे. आजची दुसरी बातमी कोरोना लसीकरणाची आहे. आजची तिसरी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदिवण्यात आल्याची आहे. आजची चौथी बातमी कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देता येणार नसल्याचं केंद्राने स्पष्ट केल्याची आहे. आजची पाचवी बातमी चीनच्या कोरोना लसींची आहे. 

  1. महाविकास आघाडीत पडला 'लेटरबॉम्ब'; काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते फोडतायेत -आमदार प्रताप सरनाईक :  महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये  (Government) सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. दिवसेदिवस सरकारमधील तीन पक्षांमध्ये दुरावा वाढताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) स्वबळावर निवडणूक लढविण्याचा विचार करत आहे. नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेला उत्तर देत शिवसेनेनेही (Shivsena) आपली जाहीर भूमिका मांडली. तीन्ही पक्षात असे वाद होत असतानाच शिवसेना आमदार (Shiv Sena MLA)  प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या लेटरबॉम्बने महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता दाट झाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. देशात उद्यापासून 18 ते 44 वयोगटाचे मोफत लसीकरण; मुंबई महानगरपालिकेने आखलाय मेगाप्लान : देशात सोमवार 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) सुरू होणार आहे. या लसीकरण मोहीमेसाठी मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) एक मेगा प्लान (megaplan) तयार केला आहे. फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर (super spreader) ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. अजित पवारांच्या कार्यक्रमात गर्दी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल :  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांच्या हस्ते करण्यात आलं होत. मात्र, कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने, कोरोना नियमांचे (corona) तीन तेरा वाजल्याचे पहायला मिळाले होते. दरम्यान, या गर्दीवर सोशल मिडीया वरती तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी नाराजीसह संताप व्यक्त केला होता. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देता येणार नाही - केंद्र सरकार : कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई म्हणून देणे शक्य नाही. तसे केल्यास डिझास्टर रिलीफ फंडच संपून जाईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. कोरोना बळींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे राज्यांच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरचे असल्याचेही केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. चीनची सिनोव्हॅक लस घेतल्यानंतर ३५० इंडोनेशियन आरोग्य कर्मचारी पॉझिटीव्ह, लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : चीनची 'सिनोव्हॅक' ही कोरोना प्रतिबंधक लस (Sinovac) घेतल्यानंतर इंडोनेशियातील (Indonesia) ३५० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील बहुसंख्य कोरोनाबाधित असिंप्टोमॅटिक प्रकारातील असून डझनभर कर्मचाऱ्यांना (Health Workers) मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करावा लागले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी