दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०२१: अनधिकृत बांधकाम पाडण्यास मुख्यमंत्र्यांच्या सुचना ते चीन लढाईच्या तयारीत

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 20, 2021 | 20:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 20 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 20 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने मंगळवारी सेक्स टुरिझम (Sex Tourism) रॅकेटचा पर्दाफाश केला.
  • न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तिन्ही आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच असतील
  • LACवर सज्ज चिनी सैन्याच्या १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा

नवी दिल्ली : Headlines of the 20 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मुंबईतील अनधिकृत बांधकाम पाडण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचना दिल्याची आहे. आजची दुसरी बातमी आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची आहे. आजची तिसरी बातमी सेक्स टुरिझम रॅकेटची आहे. आजची चौथी बातमी कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष काढणार असल्याची आहे. आजची पाचवी बातमी चीनने LACवर अॅडव्हान्स रॉकेट लाँचर तैनात केल्यााची आहे. 

  1. मुंबईतील अनधिकृत बांधकाम पाडा, मी तुमच्या पाठीशी, मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या सूचना : अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर तातडीने कारवाई करावी. यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. No Bail To Aryan आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचाचा जामीन फेटाळला : क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये आरोपी असलेल्या आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या तीन आरोपींचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला. यामुळे न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तिन्ही आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच असतील. याआधी न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवून २० ऑक्टोबर रोजी जाहीर करू असे सांगितले होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Sex Tourism मुंबई पोलिसांनी सेक्स टुरिझम रॅकेट केले उद्धवस्त, दोघांना विमानतळावरून अटक :  मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने मंगळवारी सेक्स टुरिझम (Sex Tourism) रॅकेटचा पर्दाफाश केला आणि दोन लोकांना अटक केली. पोलिसांनी दोन पीडितांची सुटकाही केली. एका साथीदारासोबत सेक्स टुरिझम रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावरील पोलिस अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून काम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा  2020 अंतर्गत अटक करण्यात आली होती. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोडला काँग्रेसचा हात; नव्या पक्षाची घोषणा, भाजपशी होणार 'या' शर्तीवर युती : पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसचा हात सोडताना त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा करत जोरदार झटकादेखील दिला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. चीन लढाईच्या तयारीत, LACवर सज्ज केले १००पेक्षा जास्त अॅडव्हान्स रॉकेट लाँचर :  चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि काही महिन्यांत संपूर्ण जगाला कोरोना संकटाने घेरले. या संकटातून सावरत असलेल्या जगासमोर चीनमुळे नवे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. चीन भारताशी लढाई करण्याची तयारी करत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी