दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०२१: 5-11 वयोगटासाठी फायझर लस सुरक्षित ते रशियात अंदाधुंद गोळीबार

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 20, 2021 | 20:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 20 September 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole day Top 5 News 20 September 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०२१:  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रशियातील पर्म विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार
  • फायझर आणि बायोटेकने सोमवारी सांगितले की चाचणीच्या निकालांवरून दिसून आले की त्यांची कोरोना व्हायरस लस सुरक्षित आहे
  • विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली : Headlines of the 20 September 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी फायझर कोविड लसी संदर्भातील आहे. आजची दुसरी बातमी मराठी बिग बॉसच्या स्पर्धेकाविषयीची आहे. आजची तिसरी बातमी सोमय्यावरील कारवाईविषयीची आहे. आजची चौथी बातमी फडणवीसांनी मुश्रीफांवर केलेल्या टीकेची आहे. आजची पाचवी बातमी रशियातील विद्यापीठात झालेल्या गोळीबाराची आहे. 

  1. Big Breaking । 5-11 वयोगटातील मुलांसाठी फायझर कोविड लस सुरक्षित: क्लिनिकल ट्रायलचा परिणाम : फायझर आणि बायोटेकने सोमवारी सांगितले की चाचणीच्या निकालांवरून दिसून आले की त्यांची कोरोना व्हायरस लस सुरक्षित आहे आणि पाच ते 11 वयोगटातील मुलांमध्ये एक मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, ते लवकरच नियामक मान्यता घेतील. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. बिग बॉस मराठी 3 मध्ये घुमणार कीर्तनाचे सूर.. :  बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं ग्रॅण्ड ओपनिंग नुकतचं झालंय. गेल्यावर्षी कोरोनामुळे बिग बॉसच्या घरात कुणालाच एन्ट्री नव्हती. त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घरात कुणाला एन्ट्री मिळणार याची उत्सुकता होती. यंदा कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे बिग बॉसच्या घरात दाखल झालेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. सोमय्यांवर मुख्यमंत्री कार्यालय नाही तर गृहमंत्रालयानं कारवाई केली: संजय राऊत : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील घोटाळ्याचा अधिकचा तपशील घेण्यासाठी कोल्हापूरला निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या रेल्वे स्थानकावर अडवलं. धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. कोणालाही द्यायला आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाही;फडणवीसांचा मुश्रीफांवर पलटवार : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सातत्यानं महाविकासआघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे (Hassan Mushrif) आपला मोर्चा वळवला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. रशियातील पर्म विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार: 8 जण ठार; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या :  रशियातील (Russia) पर्म (Perm) शहरातील विद्यापीठात सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी अधाधुंध गोळीबार केला. या गोळीबारात (Shooting) आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे, तर सह जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी