दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जुलै २०२१: राज्यात सर्वत्र पाऊस ते भारतात देण्यात आले ४१ कोटी लसीचे डोस

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 21, 2021 | 20:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 21 July 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 21 July 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जुलै २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय
  • पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  • मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता

मुंबई : Headlines of the 21 July 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी राज्यातील पावसाविषयीची आहे. आजची दुसरी बातमी ऑक्सीजनवरुन राज्य सरकार आणि केंद्रात वाद होत असल्याची आहे. आजची तिसरी बातमी चीनने घेतलेल्या बुलेट ट्रेनच्या चाचणीची आहे. आजची चौथी बातमी राज कुंद्रावर एका अभिनेत्रीने आरोप केल्याची आहे. आजची पाचवी बातमी भारतातील कोरोना लसींविषयीची आहे. 

  1. राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. ऑक्सिजनवरून देशातील राजकारण तापलं; विरोधक अन् केंद्र सरकार आमने-सामने :  ऑक्सिजन अभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे उत्तर काल केंद्र सरकारने राज्यसभेत दिले. यावरुन आता देशभरात राजकारण तापलं असून विरोधक प्रचंड संतापले आहेत. काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. ताशी ६०० किमी वेगाने धावणार चिनी सुपरफास्ट ट्रेन 'मॅग्लेव' : कोरोना संकटासाठी जगातील अनेक देश चीनला दोष देत आहेत. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकटामुळे कोलडमली आहे. या अशा वातावरणात चीनने पूर्वेकडील शॉनडॉन्ग प्रांतातल्या किंगडाओं येथे मंगळवारी ताशी ६०० किमी वेगाने धावणाऱ्या चिनी बनावटीच्या सुपरफास्ट ट्रेनची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले. या ट्रेनला चीनने 'मॅग्लेव' हे नाव दिले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. नग्न ऑडिशन देण्याची मागणी करणारा बहुतेक तो राज कुंद्राच; अभिनेत्रीचा आरोप :  पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला (Raj kundra arrest)  रात्री अटक केली. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली. आता काही अभिनेत्री पुढे येऊन याप्रकरणी आपले अनुभव सांगत आहेत. यामुळे राजच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारतात लसचे ४१ कोटी डोस दिले:  भारतात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसचे ४१ कोटी डोस देण्यात आले (टोचण्यात आले). यापैकी ३५ कोटींपेक्षा जास्त डोस हे सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसचे तर ५.४५ कोटी डोस हे भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिनचे आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी