दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जून २०२१ : मोफत लसीकरणाला सुरुवात ते समांतर वेबसिरीजचा टीझर लॉन्च

Headlines of the 21 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 21 June 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जून २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पेट्रोलपेक्षा कित्येक पटींनी चांगले इथेनॉल इंधन
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसरी बैठक शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सुरू आहे
  • 18 हजार किलो वजनाचा हा महाकाय बाँब एअरक्राफ्ट कॅरिअरजवळ समुद्रात पाडला

मुंबई : Headlines of the 21 June 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी लसीकरणाची आहे, आजपासून मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजची दुसरी बातमी, शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याची आहे. आजची तिसरी बातमी वाहन चालकांसाठी महत्त्वाची आहे. आजची चौथी बातमी अमेरिकेच्या युद्ध सरावची आहे. तर आजची पाचवी बातमी मराठी मराठी वेबसिरीज समांतरचा टीझर लॉन्च झाल्याची आहे.  

  1. आजपासून 18 वर्षावरील वयाच्या लोकांचे मोफत लसीकरण; कोण-कोणत्या गोष्टींची घेणार दक्षता : आजपासून म्हणजेच 21 जूनपासून देशात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे केंद्राकडून मोफत लसीकरण (Free vaccination) केले जाणार आहे. यासाठी Co-Win अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. BIG BREAKING : शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसरी बैठक शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सुरू आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी दोघांची पहिली बैठक मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली होती. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. महाग पेट्रोलपासून मिळणार दिलासा, १०० रुपये नाही तर इतके स्वस्त मिळणार पेट्रोल : पेट्रोलच्या (Petrol) वाढत्या किंमतींच्या (increasing rates) पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या जागी एक वेगळे (different) आणि स्वस्त इंधन (cheap fuel) उपयोगात आणण्याचा विचार सध्या केला जात आहे. हे इंधन म्हणजे इथेनॉल (ethanol). सरकार येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये फ्लेक्स फ्यूएल इंजिनबाबत (flex fuel engine) मोठा निर्णय (big decision) घेण्याची शक्यता आहे. हे इंजिन ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी (automobile sector) अनिवार्य (compulsory) केले जाणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Video: अमेरिकेच्या नौदलाने फोडला 18 हजार किलोंचा महाकाय बॉम्ब, समुद्रात झाला भीषण भूकंप : चीनच्या नौदलाच्या (Chinese navy) वाढत्या समुद्री ताकदीचा (naval strength) सामना करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने (USA Army) आपल्या सर्वात नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरवर (newest aircraft carrier) भयंकर बाँब हल्ल्याचा (bomb attack) परिणाम (effects) पाहण्यासाठी परीक्षण (test) केले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सुपरहिट 'समांतर' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर लाँच : स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'समांतर २' या एम एक्स प्लेअरच्या वेबसीरिजचा टीझर लाँच झाला. हा समांतरचा दुसरा सीझन आहे. याआधी समांतर वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi) कुमार महाजन ही भूमिका साकारत होता. तर नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका साकारली होती. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी