दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ नोव्हेंबर २०२१: INS विशाखापट्टणम नौदलात दाखल ते अभिनेत्री माधवी गोगटे यांच निधन

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 21, 2021 | 23:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 21 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 21 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 21 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका ७५ टक्के स्वदेशी उपकरणांनी सज्ज
  • वन रक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
  • विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली.

Whole Day Top 5 News 21 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 21 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस नवीन युद्धनौका दाखल झाल्याची आहे. आजची दुसरी बातमी वाघाच्या हल्ल्यात मृत पावणाऱ्या महिला वन रक्षकाला शासनाकडून मदत जाहीर झाल्याची आहे. आजची तिसरी बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्याविषयीची आहे. आजची चौथी बातमी विधान परिषदेचं तिकीट न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची बातमी आहे. आजची पाचवी बातमी अभिनेत्री माधवी गोगटे यांच्या निधनाची आहे.

  1. भारतीय नौदलाच्या सेवेत INS विशाखापट्टणम : आज (रविवार २१ नोव्हेंबर २०२१) भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका दाखल झाली. आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका ७५ टक्के स्वदेशी उपकरणांनी सज्ज केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. वाघाच्या हल्ल्यात महिला वन रक्षकाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत स्वाती ढुमणे यांच्या प्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. भाजपने १३ नोव्हेंबरचा अमरावती बंद पुकारला होता, ती प्रतिक्रिया होती! : त्रिपुरामध्ये जी घटना घडली नाही तिचे भांडवल करुन अमरावती जिल्ह्यात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंसा करण्यात आली. विशिष्ट समाजाच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करुन तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. मालमत्तेची हानी करण्यात आली. या प्रकाराला प्रतिक्रिया देण्यासाठी १२ नोव्हेंबरच्या हिंसेचा निषेध करण्यासाठी भाजपने १३ नोव्हेंबर २०२१ रोजी अमरावती बंद पुकारला होता; असे महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. पंकजा मुंडेंची पुन्हा खदखद, विधान परिषदेचे तिकीट कापल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या.... :  भारतीय जनता पार्टीच्या माजी मंत्री तथा नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी पुन्हा एकदा कापली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलावून दाखवली आहे. दरम्यान, भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहीत मुलगी आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी